मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला किती जागा मिळणार? जाणून घ्या सट्टा बाजाराचा अंदाज

मुंबई – मुंबई महापालिकेवर (Mumbai Municipal Corporation) विजय मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेत (BJP And  Shivsena )जोरदार संघर्ष पाहायला मिळत असतानाच सट्टा बाजारात भाजपची चलती असल्याचे दिसून येत आहे. बीएमसी निवडणुकीत सत्ताधारी भाजप, शिवसेना, मनसे (MNS), राष्ट्रवादी आणि काँग्रेस (Congress) यांच्यामध्ये 236 जागांसाठी लढतील. भाजपला जवळपास 120 जागांवर विजय मिळवण्याची खात्री आहे.

सध्याचे ट्रेंड पाहता हा आकडा 130 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. BMC निवडणुकीत भाजपने 120 जागा जिंकल्याबद्दल बुकी प्रत्येक एक रुपयाच्या वर 1 रुपया द्यायला तयार आहेत. 100 पेक्षा जास्त जागांवर भाजपच्या विजयावर सट्टा लावण्यासाठी, बुकींना प्रत्येक रुपयावर 0.25 पैसे द्यावे लागतील. 110 जागांसाठी एक रुपयावर 55 पैसे इतकी शक्यता आहे.

शिवसेना बीएमसी निवडणुकीत फक्त 10 ते 30 जागा जिंकेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे रुपयाला 10 पैशांपासून ते 62 पैशांपर्यंत दर देण्यात आला आहे. तथापि, शिवसेना ४० जागा जिंकल्यास बुकी रुपयावर अडीच रुपये देण्याच्या तयारीत आहेत. शिवसेना 40 जागा जिंकेल अशी शक्यता बुकींनी वाटत नाही.

राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मनसेला 5 ते 15 जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यासाठी रुपयावर बुकींची 22 पैशांपासून 85 पैशांपर्यंत रेट देण्याची तयारी आहे. शिवसेनेच्या प्रस्थापित विरोधी लाटेचा फायदा मनसेला होईल, असेल बोलले जात आहे. शिवसेनेकडील काही मते भाजपकडे जातील अशी शक्यता होती, पण आता ती मनसेकडे जातील असेही बुकी म्हणतात. बुकींनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला कोणताही रेट दिलेला नाही. याबाबत  एबीपी माझाने ‘द हिंदू बिझीनेस लाईन’ने (The Hindu Business Line) दिलेल्या वृत्ताचा आधार दिला आहे.