Clean Up : घरच्या घरी चेहरा क्लीन अप कसा करावा? पार्लरमध्ये क्लीन अप कसा केला जातो?

Beauty Tips By Sukhada Daswadkar:- धावपळीच्या या युगात मुली आणि महिलांसाठी कोमल, निर्मळ, पिंपल्स आणि डाग नसलेला चेहरा मिळवणे मोठे आव्हान बनले आहे. चेहरा क्लिन ठेवण्यासाठी महिला महागडे प्रोडक्ट वापरतात. तरीही अनेकांच्या चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होत नाहीत. त्यामुळे घरगुती साधने वापरून चेहरा क्लिन ठेवण्यावर अधिकतर महिला भर देताना दिसत आहेत. पुणे येथील लक्ष्मीनगर भागात पार्लर चालवणाऱ्या आणि जवळपास २५ वर्षांचा अनुभव असणाऱ्या सुखदा दसवडकर यांनी घरच्या घरी चेहरा क्लिन ठेवण्यासाठी काय उपाय करता येऊ शकतात?, याबद्दल खालील व्हिडिओत सांगितले आहे.