कोरोनाच्या वाढत्या संकटाशी लढण्यासाठी व्हा तयार, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खा ‘हे’ पदार्थ

चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. कोरोनाचा ओमिक्रॉन बीएफ.७ व्हेरिएंट (Omicron BF.7) सध्या चीनमध्ये हाहाकार माजवतो आहे. त्यामुळे भारतासह इतर देशही हाय अलर्टवर आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचे असते, मानवी शरीर आरोग्यदायी असणे. आणि शरीर तेव्हा आरोग्यदायी राहते, तेव्हा त्याची रोगप्रतिकारक शक्ती (immune system strong) मजबूत असते.  रोगप्रतिकारक शक्ती शरीराला संसर्गाशी लढण्यास मदत करते. परिणामी मानवी शरीर कोरोनाशीही लढा देऊ शकते.

भारतात सध्यातरी कोरोनाचे फारसे रुग्ण आढळलेले नाही. मात्र कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वीच तुम्ही स्वत:ला तयार ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे जर तुम्हालाही तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल, या पदार्थांचा आजपासूनच जेवणात समावेश करा. (Eat these things to make the body strong and increase immunity)

1. अँटिऑक्सिडंट्स समृद्ध अन्न
कांदे, लसूण, आले, गाजर आणि अगदी भोपळा यांसारख्या सुपरफूडमध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, बी आणि ई देखील आढळतात. तुम्ही रोजच्या आहारात यांपैकी कोणत्याही एकाचा समावेश करू शकता. हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करेल आणि संसर्गाशी लढण्यास मदत करेल.

2. व्हिटॅमिन सी समृद्ध गोष्टी
व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. पेरू, संत्री, आवळा, बेरी, लिंबू इत्यादी लिंबूवर्गीय फळांना तुमच्या आहाराचा भाग बनवून तुम्ही तुमची प्रतिकारशक्ती वाढवू शकता. याशिवाय तुमच्या आहारात मोरिंगा, तुळशीची पाने, स्पिरुलिना, कडुलिंब, ग्रीन टी यांचा समावेश करा.

3. हळदीचे सेवन
हळद आणि काळी मिरी यांचा आहारात समावेश करा. आयुर्वेदानुसार, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ही एक जुनी आणि चाचणी केलेली कृती आहे. एक ग्लास पाण्यात हळद, दालचिनी, लवंग, वेलची, केशर इत्यादी टाकून चहा म्हणून घेऊ शकता. याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हळदीचे दूध प्रभावी मानले जाते.

4. जेष्ठमधचे सेवन
जेष्ठमधामध्ये (Liquorice) अनेक अँटी-व्हायरल, अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. हे अनेक विषाणूजन्य रोग बरे करण्यासाठी प्रभावी मानले जाते. तज्ञांच्या मते, सर्दी आणि फ्लूच्या बाबतीत जेष्ठमधाचा चहा घेता येतो.

5. लाल शिमला मिर्ची
प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही लाल शिमला मिर्ची खाऊ शकता. लाल शिमला मिर्चीमध्ये लिंबूवर्गीय फळांपेक्षा तिप्पट जास्त व्हिटॅमिन सी असते. यामध्ये बीटा कॅरोटीन मुबलक प्रमाणात आढळते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासोबतच डोळे निरोगी ठेवते.