रायगड जिल्ह्यातील शेकडो रिपाई कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

Congress: काँग्रेस पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काँग्रेस पक्षच सर्वांना बरोबर घेऊन जाऊ शकतो, सर्व जाती धर्मांच्या लोकांना न्याय मिळवून देऊ शकतो हा विश्वास दृढ होत आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi), मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून इतर पक्षातील असंख्य नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटले आहे.

काँग्रेस पक्षाचे मुख्यालय टिळक भवन येथे रायगड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे युवा नेते अमेय मोहिते यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे रायगड जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या सर्वांचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.

नफरत छोडो, भारत जोडो चा संदेश देत राहुलजी गांधी यांनी लोकशाही व संविधान वाचवण्याची लढाई सुरु केलेली आहे. राहुलजी गांधी यांची वाढती लोकप्रियता, सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जण्याचा विश्वास तसेच ज्येष्ठ अनुभवी नेते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास आणखी वाढत चालला आहे. देशातील वातावरण बिघडवणाऱ्या शक्तींना चोख उत्तर देत काँग्रेस पक्षाचा विचार तळागाळात पोहचवण्यासाठी काम करा. हुकूमशाहीशक्ती विरोधात राहुल गांधी व मल्लिकार्जून खर्गे हे लढा देत आहेत, या लढाईत सहभागी होत देशाचे संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी काम करा, असे आवाहन यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांशी केले.

रिपब्लिकन पार्टीचे उलवेचे अध्यक्ष महेश जंगले, अमित पवार, राम पवार, महेंद्र मोहिते, राजू मनवर, श्याम गुडदे, रघुनाथ भगत, दिनेश वाघमारे, संजय गावंड, लक्ष्मण चौगुले, संदीप भालेराव, दिपक पट्टेबादूर, विलास कांबळे, संतोष सरकटे, दत्तात्रय करे, मारोती जाधव, कविता झटाते, सविता काळे, पलक काळे, परिनिती झटाले, शुभांगी नकटे, काजल रावत, कलावती कौर, निशा मोरे, कृष्णा कौर, माधुरी जैस्वाल, निशा राठोड, समशिदा शेख, प्रियंका राठोड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

https://youtu.be/gCfxHtR26Wo?si=MEthSTF6L7ExyINO

महत्वाच्या बातम्या-

Pune Ganeshotsav 2023 : गणपती विसर्जन मिरवणुकीत हृदयविकाराचा झटका आल्याने पुण्यात 23 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू ?

Ganesh Visarjan 2023: पुण्यातील मानाचे कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरूवात

नवरात्रीत स्वत:ला एक सुंदर लुक द्यायचा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा