शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये उभारले जाणार शिवछत्रपतींचे सुवर्ण मंदिर आणि जगातील सर्वात मोठा पुतळा

माजी आमदार शरद सोनवणे यांच्या घोषणेने महाराष्ट्रातील शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण

Chhatrapati Shivaji Maharaj Statue: हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य रयतेसाठी देणारे महाराष्ट्रासह संपूर्ण भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी म्हणजे जुन्नर (Junnar). याच शिवजन्मभूमीत छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहसनधारी सुवर्ण मंदिर, महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा व मागे स्वराज्याचा सर्वात उंच भगवा ध्वज उभारण्याची घोषणा माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाध्यक्ष शरद सोनवणे यांनी केली आहे. आळेफाटा येथे आयोजित भव्य कार्यक्रमामध्ये सोनवणे यांनी ही घोषणा केली. यावेळी जुन्नर तालुका आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जुन्नर शहरातील शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीपासून ५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गोद्रे गावामध्ये २५ एकर क्षेत्रावर छत्रपती शिवाजी महाराजांचे सोन्याने मढवलेले सुवर्णमंदिर उभारण्यात येणार आहे. याच परिसरामध्ये शिवरायांचा जगातील सर्वात उंच २०० फुट उंचीचा पुतळा उभारण्यात येणार असून ८० मीटर उंचीचा स्वराज्याचा भगवा ध्वज देखील असणार अशी माहिती यावेळी शरद सोनवणे यांनी दिली. हातात तलवार असलेला शिवरायांचा हा पुतळा ब्रॉन्झ धातूमध्ये मुंबई येथे तयार करण्यात येणार असून त्यासाठी जे.जे स्कूल ऑफ आर्टस् या नामांकित संस्थेत काम करण्याचा अनुभव असणाऱ्या ज्येष्ठ शिल्पकाराची निवड करण्यात आली आहे. संपूर्ण जगाला शिवरायांच्या या पुतळ्याची नोंद घ्यावी लागेल, असा हा पुतळा असेल असं यावेळी शरद सोनवणे (Sharad Sonawne) म्हणाले.

पुढे बोलताना सोनवणे म्हणाले, संपूर्ण जगाला रयतेचे राज्य देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असणाऱ्या जुन्नर तालुक्यात महाराजांचे मोठे सुवर्णमंदिर आणि जगातील सर्वात उंच पुतळा उभारणे आपले कर्तव्य आहे. सुरुवातीला ही संकल्पना आपली स्वतःची असल्याने इतर कोणावरही आर्थिकभार न टाकण्याचा निर्णय घेतला होता. परंतु मित्र आणि सहकाऱ्यांच्या आग्रहामुळे "श्रीमंत योगी सुवर्ण स्मारक ट्रस्ट" ( रजि – पुणे/0000/317/2023) ची स्थापना करण्यात आली आहे. शिवरायांचे भव्यदिव्य सुवर्ण मंदिर, पुतळ्यासह शिवकालीन इतिहास जागवणारे काम ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येणार असून संपूर्ण उभारणी आणि पुढे देखभाल ट्रस्टच्या माध्यमातून केली जाणार असल्याची माहिती यावेळी सोनवणे यांनी दिली.

गेली महिनाभरापासून सोनवणे आणि त्यांच्या समर्थकांकडून सोशल मिडिया तसेच फ्लेक्सच्या माध्यमातून “सर्वात मोठी घोषणा होणार” हे वाक्य व्हायरल करण्यात येत होते. आज अखेर त्यांनी केलेल्या घोषणेने महाराष्ट्रातील शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे.

https://youtu.be/gCfxHtR26Wo?si=MEthSTF6L7ExyINO

महत्वाच्या बातम्या-

Pune Ganeshotsav 2023 : गणपती विसर्जन मिरवणुकीत हृदयविकाराचा झटका आल्याने पुण्यात 23 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू ?

Ganesh Visarjan 2023: पुण्यातील मानाचे कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरूवात

नवरात्रीत स्वत:ला एक सुंदर लुक द्यायचा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा