Esha Deol वर पतीचे गंभीर आरोप, घटस्फोटासाठी अभिनेत्री जबाबदार?

Esha Deol- Bharat Takhtani Separation : गेल्या काही काळापासून अभिनेत्री ईशा देओलबद्दल (Esha Deol) बातम्या येत होत्या की तिच्या वैवाहिक आयुष्यात सर्व काही ठीक चालत नाहीये. त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या माध्यमांमध्ये गाजत होत्या. ईशानेही या वृत्ताला दुजोरा देत आपण पती भरत पासून वेगळे झाल्याचे सांगितले होते. भरतचे दुसऱ्या मुलीसोबत अफेअर सुरू असल्याने तिने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात होते. मात्र आता भरतने वेगळेच कारण सांगितले आहे. आता भरतची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्याने ईशा देओल खूप पझेसिव्ह असल्याचे सांगितले होते.

ईशामध्ये खूप ईगो आहे
खरंतर भरतने एका जुना मुलाखतीत दावा केला होता की त्याची पत्नी ईशा देओल त्याला खूप त्रास द्यायची. भांडणांबद्दल जेव्हा त्याला प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तो म्हणाला ‘ मला वाद घालायला आवडत नाही, पण ईशाला त्याच त्याच गोष्टी पुन्हा उगाळायची सवय आहे. ती प्रत्येक मुद्दा पकडून ठेवते आणि तिच्यात खूप ईगो आहे. पण मी असा नाहीये,’ असं भरतने सांगितलं होतं.

‘ईशा माझ्याबाबतीत खूप पझेसिव्ह आहे, ती मला नेहमी पकडून ठेवते. मी माझ्या जुन्या मित्रांना देखील भेटू शकत नाही, कारण ती नाराज होते. भविष्यात ईशा (आमच्या) मुलांबद्दलही पझेसिव्ह होईल… ती तर नर्सला देखील बाळाला हात लावू देणार नाही ‘ अशा शब्दात भरतने ईशाच्या वागणुकीबद्दल सांगितले होते. यामुळे त्यांच्या घटस्फोटासाठी भरतप्रमाणेच ईशाचाही हात नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

Nikhil Wagle | पुण्यात निखील वागळेंवर हल्ला, भाजप कार्यकर्त्यांनी पत्रकाराची गाडी फोडली

मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर दोन उपमुख्यमंत्र्यांचा डोळा असून सत्तासंघर्षातून महाराष्ट्राच्या हिताकडे दुर्लक्ष होत आहे

Nana Patole | महाराष्ट्रात गुंडाराज, सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा