Rohidas Patil | प्रकृती अस्वास्थामुळे दाजीसाहेब रोहिदास पाटील रुग्णालयात दाखल, कोल्हापूर येथे उपचार सुरु.

माजी मंत्री, खान्देश नेते दाजीसाहेब रोहिदास पाटील (Rohidas Patil) हे आपल्या मुलीकडे कोल्हापूर (Kolhapur) येथे गेले असतांनाच गेल्या आठवड्यात त्यांची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे फूफ्फूस कमी क्षमतेने काम करत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे.

कोल्हापूर येथील साई कार्डीयाक सेंटर येथील आयसीयूत डॉ. चंद्रशेखर पाटील (Dr. Chandrasekhar Patil) आणि कोल्हापूर येथील फूफ्फूस तज्ञ त्यांच्यावर उपचार करत आहेत.पहिल्या आठवड्यात त्यांनी उपचाराला चांगला प्रतिसाद दिला.मात्र कालपासून प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांचे सुपूत्र विनय पाटील (Vinay Patil), आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) हे सोमवारपासून कोल्हापूर येथेच आहेत. कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी रुग्णालयात न येता आपल्या घरीच माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील (Rohidas Patil) यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या : 

Nikhil Wagle | पुण्यात निखील वागळेंवर हल्ला, भाजप कार्यकर्त्यांनी पत्रकाराची गाडी फोडली

मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर दोन उपमुख्यमंत्र्यांचा डोळा असून सत्तासंघर्षातून महाराष्ट्राच्या हिताकडे दुर्लक्ष होत आहे

Nana Patole | महाराष्ट्रात गुंडाराज, सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा