केतकी चितळे हिचा मला अभिमान आहे; सदाभाऊ खोत यांचा केतकीला जाहीर पाठींबा 

तुळजापूर –  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्यावर केतकी चितळेने ( Ketki Chitale ) आक्षेपार्ह पोस्ट केली होती. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केतकीच्या पोस्टचा तीव्र शब्दात विरोध केला जातोय. इतकचं नाही तर केतकीविरोधात अनेक ठिकाणी तक्रार करण्यात  आल्या असून पुणे, कळवा, गोरेगाव, बीड आणिउस्मानाबाद या ठिकाणीही गुन्हे दाखल झालेत. या पोस्टमुळे अभिनेत्रीला अटक देखील झाली आहे.

केतकीच्या या फेसबुक पोस्टने राज्याच्या राजकारणात खळबळ माजवली आहे.  एका बाजूला राजकारणातील दिग्गज नेते या कृत्याचा निषेध नोंदवत असताना दुसऱ्या बाजूला मात्र, माजी मंत्री आणि विद्यमान आमदार सदाभाऊ खोत ( Sadabhau Khot ) यांनी केतकी चितळे हिचे समर्थन केलंय.

सदाभाऊ खोत यांनी तुळजापूर येथे तुळजाभवानी देवीचे ( Tulja Bhavani Mandir ) दर्शन घेतल. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, केतकी चितळे हिचा मला अभिमान आहे. ती कणखर आहे. तिला समर्थनाची गरज नाही. तिला मानावे लागेल. न्यायालयात तिने स्वतःची बाजु स्वतः मांडली.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, चंद्रकात पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टिका करताना तुमची नैतिकता कुठे गेली होती असा सवाल ही त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला विचारला आहे.