Suryakumar Yadav | मुंबई इंडियन्समध्ये परतला सूर्यकुमार यादव, आता या खेळाडूला बसावं लागणार बाकावर

Mumbai Indians, Suryakumar Yadav | इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) मध्ये सतत पराभवाचा सामना करत असलेल्या मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवचे पुनरागमन झाले आहे. तो बऱ्याच दिवसांपासून दुखापतीने त्रस्त होता. सूर्याच्या पुनरागमनामुळे मुंबई इंडियन्सची प्लेइंग 11 मजबूत होईल. तथापि, जेव्हा स्काय संघात सामील होईल तेव्हा एका खेळाडूचा पत्ता कापला जाणे निश्चित आहे.

नमन धीर याची जागा धोक्यात
सूर्यकुमार (Suryakumar Yadav) हा भारतीय खेळाडू आहे, त्यामुळे तो परतल्यास एक भारतीय खेळाडू प्लेइंग 11 मधून बाहेर असेल. सूर्या परतल्याने नमन धीरच्या जागेला धोका निर्माण झाला. या मोसमात नमनची आतापर्यंतची कामगिरी काही विशेष झाली नाही. त्याने 3 सामन्यात केवळ 16.67 च्या सरासरीने 50 धावा केल्या आहेत. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याला खातेही उघडता आले नाही आणि तो गोल्डन डकचा बळी ठरला. यापूर्वी त्याने हैदराबादविरुद्ध 14 चेंडूत 30 धावांची खेळी केली होती. एमआयच्या या मोसमातील पहिल्या सामन्यात त्याने 10 चेंडूत 20 धावा केल्या.

सूर्या अनेक दिवसांपासून क्रिकेटपासून दूर आहे
डिसेंबर 2023 पासून सूर्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. याआधी त्याच्या घोट्यात ग्रेड 2 लिगामेंट फाटला होता. त्यानंतर त्याच्यावर स्पोर्ट्स हर्नियाची शस्त्रक्रिया झाली. सुमारे 4 महिन्यांनी बरे झाल्यानंतर, तो परत येण्यास तयार आहे. सूर्यकुमारच्या आयपीएलमधील कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 39 सामन्यांत 32.17 च्या सरासरीने आणि 143.32 च्या स्ट्राईक रेटने 3249 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 21 अर्धशतक आणि 1 शतक झळकावले आहे. सूर्यकुमार यादवची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या 103* धावा आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narayan Rane | पुण्याची खासदारांची विशेष परंपरा मुरलीधर मोहोळ जोपासणार

Uddhav Thackeray | मुंबईतल्या २ जागा मित्रपक्षाला दिल्यात, ते लढणार नसतील तर आम्ही लढू

Vasant More | “२५ वर्ष ज्या पक्षात एकनिष्ठ राहिलो, तिथे न्याय मिळाला नाही”; वसंत मोरेंनी बोलून दाखवली खंत