मी तुमच्या भाकऱ्या खाऊन मोठा झालोय; नरेंद्र मोदीचं पंजाबमध्ये प्रतिपादन

पठाणकोट : पंजाब विधानसभा निवडणूक 2022 च्या प्रचाराच्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर पठाणकोटमध्ये हल्लाबोल केला. पठाणकोट येथे सैनिकांनावर झालेल्या हल्ल्याची आठवण काढत ते म्हणाले की, जेव्हा दहशतवादी पठाणकोटमध्ये दहशत माजवत होते तेव्हा कॉंग्रेसचे नेते कुठे लपून बसले होते, असा सवाल ही नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेस पक्षाला केला आहे.

कॉंग्रेसने पंजाब आणि देशाच्या विरोधात कितीदा षंढ़यंत्र रचले. पठाणकोट मध्ये जेव्हा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला, तेव्हा सगळा देश एकजूट झाला होता. परंतु या प्रसंगी कॉंग्रेसचे नेते पार्टी करीत होते. त्यांना या घटनेची काहीही काळजी वाटली नाही, असंही मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदी यांनी आपल्या जुन्या शैलीत कॉंग्रेसबद्दल काही सवाल केलेत. कॉंग्रेसने त्यांनी लष्कराच्या शौर्यावर प्रश्न उपस्थित केले की नाही? त्यांनी शहीद जवानांच्या शौर्यावर चिखलफेक केली की नाही? पुलवामा हल्ल्याच्या वर्षपूर्तीच्या दिवशीही त्यांनी तसेच केलं. इतकं काही घडून सुद्धा ते उलट आमच्या सैन्याच्या शौर्याचा पुरावा मागत आहेत.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, मी याठिकाणी पुर्वी ही ये होतो. मी तुमच्या भाकऱ्या खाऊन मोठा झालो आहे. ज्या प्रकारे मला अनेक राज्यांत भाजपची सेवा करण्याची संधी मिळाली, तशी संधी मला पंजाबमध्ये मिळाली नाही. रा अगोदर आम्ही पंजाब सरकारमध्ये एक छोटा पक्ष म्हणून काम करत होतो. पंजाबच्या शांतता, एकात्मता, आणि उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही या पक्षांसोबत काम केले.