Narayan Rane | “देवेंद्र फडणवीस मागे लागले म्हणून भाजपात गेलो”, नारायण राणे यांनी सांगितला भाजपप्रवेशाचा किस्सा

Narayan Rane | उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे जेष्ठ नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) माझ्या मागेच लागले होते. त्यांनी रस्त्यातच मला भाजपात येण्याची मागणी घातली होती, असा खुलासा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शहरात महायुती कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलत होते. भाजपात येण्यापूर्वी नारायण राणे ३९ वर्षे शिवसेनेत होते.

भाजपाच जाण्याचा किस्सा सांगताना नारायण राणे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस माझ्या मागेच लागले होते की तुम्ही भाजपात या. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलीचं की मुलाचं लग्न होतं त्यानंतर मी रस्त्यात चालत असताना फडणवीस मला भेटले मला म्हणाले एक मिनिट जरा बोलायचं होतं. तेव्हा मला त्यांनी रस्त्यातच सांगितलं दादा पक्षात या. मी म्हटलं देवेंद्र तू मला हे रस्त्यावर कसं काय विचारतो. तू मला बोलव आपण चर्चा करु. त्यानंतर आमची चर्चा घेतली. मी भाजपात गेलो. मी प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करत असतो. त्यानुसार मी विचार केला आणि त्यानंतर भाजपात जाण्याचा निर्णय घेतला.” असं नारायण राणेंनी (Narayan Rane ) म्हटलं आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Loksabha Election 2024 | राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात; चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार सर्वाधिक

Eknath Shinde | स्वार्थासाठी राजकीय आखाडे बदलणारे पहिलवान मोहोळांसमोर टिकणार नाहीत

Amit Shah | औरंगाबाद,उस्मानाबादच्या नामांतरास शरद पवार विरोध करत होते