मुली मुलांमध्ये काय पाहतात? तुमच्या आवडत्या मुलीला प्रपोज करण्याआधी हे जरूर माहिती करून घ्या!

Relationship Tips: प्रेम करणं जितकं सोप्प असतं, त्याहून कठीण असतं ते मिळवणं. बऱ्याचदा मुले त्यांच्या आवडत्या मुलीला प्रपोज करतात, परंतु मुलीचा समोरून नकार येतो. मग आपल्यातच काहीतरी कमी असावी किंवा मी माझं प्रेम व्यक्त करण्यात कुठेतरी कमी पडलो असेल, असे असंख्य प्रश्न मुलांच्या मनात उपस्थित होतात. मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या आवडत्या मुलीला प्रपोज करण्याचा विचार करत असाल, तर हा लेख तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

मुली मुलांमध्ये काय पाहतात? मुलींना कशी मुले जास्त आवडतात?, याबद्दल या विशेष लेखात आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. ही माहिती तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीला मिळवण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल!

मुली मुलांमध्ये प्रथम या गोष्टी पाहतात…

1. चेहरा
फर्स्ट इम्प्रेशन ही शेवटची छाप असते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. अशा परिस्थितीत जेव्हा मुली मुलांना पाहतात तेव्हा त्या प्रथम त्याच्या चेहऱ्याकडे पाहतात. मुलगा देखणा असेल तर मुली लगेच त्याच्याकडे आकर्षित होतात. मुलींना आवडण्यासाठी तुमचे गोरे असणे गरजेचेच आहे असे नाही आणि जर तुम्ही सावळे असाल तर मुलींना आवडणार नाही, यात काहीही तथ्य नाही. जर तुम्ही तुमच्या लूककडे लक्ष दिले तर मुली तुमच्याकडे आकर्षित होतात.

2. तुमची पर्सनॅलिटी
पर्सनॅलिटी किंवा व्यक्तिमत्व म्हणजे केवळ बॉडीबिल्डिंग नव्हे. व्यक्तिमत्व म्हणजे अनेक गोष्टी. जसे की, तुम्ही कसं बोलताय, कसं वागताय. परंतु तुम्ही शरीराने थोडेफार फिट असणेही गरजेचे असते. मुलींना जास्त जाड किंवा जास्त सडपातळ मुलेही आवडत नाहीत. तसेच बऱ्याच मुलांना अशी सवय असते की ते सतत काही ना काही बोलत राहतात. आणि ते निरर्थक बोलत राहतात ज्याला काही अर्थ नसतो. तुम्हीही असे करत असाल तर हे करणे पूर्णपणे बंद करा कारण मुलींना अशी मुले आवडत नाहीत. एका मुलीला कमी शब्दांत आपल्या मनातली गोष्ट सांगणारा व तिला समजून घेणारा मुलगा आवडतो.

3. ड्रेसिंग सेन्स
जेव्हा केव्हा मुली तुम्हाला भेटतात किंवा तुम्हाला पाहतात तेव्हा तुम्ही कोणत्या प्रकारचे कपडे घालता ते त्यांच्या लक्षात येते. तुमची ड्रेसिंग स्टाईल कशी आहे? तुम्ही स्वतःला कसे ठेवता हे तुमच्यावर अवलंबून आहे. म्हणूनच जेव्हा तुम्ही बाहेर जाल तेव्हा तुम्ही चांगले कपडे घातले पाहिजे. जर तुम्ही दाढी ठेवली असेल तर ती ट्रिम करा. काही मुलींना मोठी दाढी असलेली मुलेही आवडतात. त्यामुळे पहिल्या भेटीत मुलीला तुमचा कसा लूक आवडतो, याकडे विशेष लक्ष द्या. घराबाहेर पडताना बॉडी स्प्रेचा वापरा. हेयरस्टाईलकडे विशेष लक्ष द्या.

4. तुमचे वागणे
ही गोष्ट तुम्हाला क्वचितच माहीत असेल, पण जेव्हा एखादी मुलगी एखाद्या मुलाला पाहते तेव्हा तिला त्याचे वागणे लक्षात येते. तो इतर लोकांशी कसा बोलतो, तो मुलींचा आदर करतो की नाही. तो लोकांशी कसा वागतो?  सांगायला साधी गोष्ट आहे पण जर तुम्ही एखाद्या मुलीसमोर बसलात तर तुमच्या व्यक्तिमत्वावर त्याचा खूप परिणाम होतो. किंवा तुम्ही तिच्यासोबत कुठेतरी जात असाल तर तुमची वागणूक ती नक्कीच पाहते. जर तुम्ही तिच्याशी छान बोलला नाही किंवा तिच्याशी गैरवर्तन केले तर मुलींना ते अजिबात आवडत नाही.

5. आत्मविश्वास देखील महत्वाचा 
अनेकदा असे दिसून येते की अनेक मुलांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असते आणि त्यामुळे ते नीट बोलू शकत नाहीत, मुलींनाही हे लक्षात येते.
त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या मुलीशी बोलता किंवा बाहेर जाता आणि ती मुलगी तुमच्याकडे पाहत असेल तेव्हा तुम्ही तिच्याशी छान बोलले पाहिजे. बोलत असताना मुलीच्या डोळ्यात पाहा, यामुळे तुमचा आत्मविश्वास दिसून येतो. बोलत असताना वारंवार इकडे तिकडे पाहू नका, तुम्हाला बोलण्यात रस नाही असे वाटते. त्यामुळे ही गोष्टही लक्षात ठेवावी लागेल. आता तुम्हाला कळलेच असेल की मुली मुलांमध्ये काय पाहतात.