मी पुन्हा सांगतो, हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल – Devendra Fadnavis

MLA Disqualification Case Verdict : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Maharashtra Chief Minister Eknath Shinde) यांचा गट हाच खरा शिवसेना राजकीय पक्ष असल्याचा निर्वाळा महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Maharashtra Assembly Speaker Rahul Narvekar) यांनी काल दिला. शिवसेनेत 21 जून 2022 रोजी फूट पडली. त्या दिवसापासून सुनिल प्रभू (Sunil Prabhu) यांचं प्रतोद पद अवैध ठरतं, त्यामुळं त्यांनी जारी केलेला व्हिप किंवा त्यांनी आयोजित केलेली बैठक वैध ठरत नसल्याचं नार्वेकर यांनी काल दिलेल्या निकालात स्पष्ट केलं. तसंच नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांनी नियुक्त केलेले प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती वैध ठरवली आहे.

21 जून 2022 रोजी रोजी एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केलं आणि नंतर त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर दोन्ही गटांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तर उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे न्यायालयानं एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदाची शपथ वैध ठरवली. प्रतिस्पर्धी गटानं दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्यासाठी सभापतींनी शिवसेना पक्षाच्या मूळ घटनेवर अवलंबून राहणे आवश्यक असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. त्यानुसार नार्वेकर यांनी 1999 ची शिवसेना पक्षाची घटनाही वैध मानली आहे.

दरम्यान, या निकालावर आता राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात राज्यात सरकार स्थापन करताना संवैधानिक आणि कायदेशीर प्रक्रियेचे संपूर्णत: पालन करण्यात आले होते आणि त्यामुळेच हे सरकार मजबुत आणि भक्कम आहे, असे आम्ही प्रारंभीपासूनच सांगत होतो. त्यामुळेच मा. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आपल्या आदेशात हे सरकार बरखास्त करण्याचा कुठलाही आदेश देण्याची गरज नाही, असे स्पष्ट केले होते.

काही लोक मुद्दाम आणि वारंवार सरकारबाबत गैरसमज पसरवून राज्यातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत होते. आज विधानसभाध्यक्षांनी विविध नियमांचा दाखला घेत, जो आदेश आज दिला, त्यानंतर आतातरी कुणाच्या मनात सरकारच्या स्थैर्याबाबत शंका राहण्याचे कारण नाही. मी पुन्हा सांगतो, हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल! मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि त्यांच्या सहकार्‍यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. असं फडणवीस यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

MLA Disqualification Case Verdict : आम्हाला उध्दव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती आहे – प्रकाश आंबेडकर

MLA Disqualification Case : शिंदे गटाकडून आनंदोत्सव, ठाकरे गटाचे आंदोलन

बाळासाहेबांची शिवसेना उद्धव ठाकरेंनी गमावली; शिंदेंचा गट हीच खरी शिवसेना

उलटतपासणीला न येणं ठाकरेंना पडलं महागात; नार्वेकरांनी दाखवून दिली चूक