मी मदत मागत होतो पण कोणीसुद्धा आलं नाही; ड्रायव्हरने सांगितला त्या एका तासातला धक्कादायक थरार

Mumbai – शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete Passed Away) यांचं निधन झालं आहे. ते 52 वर्षांचे होते. आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास त्यांच्या गाडीला अपघात झाला. पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर त्यांच्या गाडीला अपघात झाला. खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ हा अपघात झाला. आज मराठा समन्वय समितीची आज दुपारी बैठक होती. त्यासाठी ते मुंबईकडे येत होते. यावेळी त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यात ते गंभीररित्या जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे.

पुढे जाणाऱ्या गाडीला मेटे यांच्या गाडीने जोरात धडक दिली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हा अपघात इतका भीषण होता की, फॉच्युनर गाडीचा पुढील भाग चक्काचूर झाला आहे. या अपघातात मेटे जखमी झाले. अपघातानंतर मेटे यांना एक तासभर कुणाचीही मदत झाली नाही. त्यानंतर त्यानंतर एमजीएम रुग्णालयात दाखल केलं होतं. मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते.

दरम्यान, या अपघातानंतर जवळपास 1 तास विनायक मेटे यांना मदत मिळाली नसल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. यावेळी मेटे यांचे सहकारी एकनाथ कदम हेदेखील त्यांच्यासोबत होते. त्यांनी या अपघाताबद्दल बोलताना सांगितलं, की एका ट्रकने कट मारल्याने बीडकडून मुंबईकडे येताना मुंबई-पुणे एक्सप्रेसवर हा अपघात झाला. अपघातानंतर एक तास मदत मिळाली नाही. यानंतर 100 नंबरवर अनेकदा फोन केला. मात्र या नंबरवरील फोनही उचलला गेला नाही. मदतीसाठी अनेकदा कदम विनवणी करत होते. मात्र, कोणीही गाडी थांबवली नाही, अशी माहिती कदम यांनी दिली आहे.न्यूज 18 लोकमतने याबाबत वृत्त दिले आहे.