मुंब्र्यातील मदरशात दाढी करण्याचा एक वस्तराही सापडला तर राजकारण सोडेन – आव्हाड

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने (MNS ) गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये (Shivaji park) पाडवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना मुंबई तसेच मुंब्रा येथील झोपडपट्टय़ांमधील मदरशांमध्ये गंभीर प्रकार सुरू असल्याने त्यांवर धाडी घालण्याची विनंती पंतप्रधानांना करण्याबरोबरच मशिदींवरील भोंगे उतरवा, अशी मागणी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारकडे केली.

दरम्यान, राज ठाकरे यांनी सकाळी लवकर उठून मुंब्र्यातील मदरशात यावे. मदरशात दाढी करण्याचा एक वस्तराही सापडला तर राजकारण सोडेन, असे आव्हान गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड ( Minister Jitendra Awhad ) यांनी राज ठाकरे यांना दिले आहे.

राज ठाकरे यांनी मुंब्र्याबद्दल कारण नसताना जातीयवादी विधान केले. माझं राज यांना जाहीर आव्हान आहे की, त्यांनी माझ्यासोबत मुंब्र्यातील कोणत्याही मदरशात यावे. दाढीचा वस्तरा जरी सापडला तरी राजकारण सोडून देईन,” असं जाहीर आव्हानच जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी दिलं. “मुंब्र्यात काही शतकं हिंदू-मुसलमान प्रेमाने राहतात. मुंब्र्याला बदनाम करू नका,” असं ही यावेळी आव्हाड म्हणाले.

कळवा-मुंब्रा ह्या मतदार संघात 67% हिंदू आहेत आणि 33% मुसलमान त्यात मी 75000 मतांनी विजयी झालो कळव्यातून 30000 ची आघाडी आणि मुंब्र्यातून 45000 मतांची आघाडी लोक कामावर मत देतात जाती पाती वर नाही ….18 तास राबावे लागते.शेवटच्या माणसा पर्यंत पोहचावे लागते असं देखील ते म्हणाले.

प्रबोधनकारांची पुस्तक वाचली तर जात पात समजेल आणि त्याचे जन्मदाते ही समजतील शरद पवार साहेबांचे नाव घेतले कि महाराष्ट्रात चर्चा होतेच … हे गणित डोक्यात ठेऊन काही जण भाषण करतात. महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट ते मशिदीबाहेर भोंगे घेऊन पोरांना बसायला सांगणे, हा प्रवास आहे राज ठाकरे यांचा. असं देखील आव्हाड म्हणाले.