मौका मौका..! ‘या’ दिवशी कट्टर प्रतिद्वंद्वी पाकिस्तानशी भिडणार भारत, वनडे विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक

India ODI World Cup 2023 Schedule : आयसीसीने क्रिकेट वर्ल्ड कप 2023 चे वेळापत्रक (ICC ODI World Cup 2023 Schedule) जाहीर केले आहे. या स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. 2019 मध्ये या दोन संघांमध्ये अंतिम सामना झाला होता, ज्यात इंग्लंडने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला होता. मोठी बातमी अशी आहे की, भारतीय क्रिकेट संघ आपला पहिला सामना 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे आणि त्यांची लढत 15 ऑक्टोबरला पाकिस्तानशी होणार आहे.

आयसीसी विश्वचषक पुन्हा एकदा राऊंड रॉबिन स्वरूपात खेळवला जाईल. म्हणजे या स्पर्धेत एकही गट नसेल. सर्व 10 संघ एकूण 9-9 लीग सामने खेळतील. अव्वल 4 संघ उपांत्य फेरीत पोहोचतील आणि त्यानंतर विश्वचषकाची अंतिम फेरी दोन सर्वोत्तम संघांमध्ये खेळवली जाईल. आयसीसी क्रिकेट विश्वचषकात टीम इंडियाचे वेळापत्रक काय आहे? ते पाहूया…

भारताचे विश्वचषक 2023चे वेळापत्रक
8 ऑक्टोबर – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई
11 ऑक्टोबर – भारत विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली
15 ऑक्टोबर – भारत विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद
19 ऑक्टोबर – भारत विरुद्ध बांगलादेश, पुणे
22 ऑक्टोबर – भारत विरुद्ध न्यूझीलंड, धर्मशाला
29 ऑक्टोबर – भारत विरुद्ध इंग्लंड, लखनौ
2 नोव्हेंबर – भारत विरुद्ध क्वालिफायर, मुंबई
5 नोव्हेंबर – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कोलकाता
11 नोव्हेंबर – भारत विरुद्ध क्वालिफायर, बेंगळुरू