घाबरून अयोध्या दौरा रद्द केला, स्वतःचा पळपुटेपणा लपवण्यासाठी मनसेने ते फोटो ट्विट केले – NCP

मुंबई – अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवण्यात आली असा आरोप मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्यातील सभेत केला. ही रसद शरद पवारांनी पुरवल्याचा आरोप मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केला होता. आता मनसे नेत्यांकडून एक फोटो शेअर करण्यात  या फोटोच्या माध्यमातून राष्ट्रवादीकडे बोट दाखवण्यात आले आहे.

या फोटोत राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करणारे भाजप खासदार बृजभूषण सिंह आणि शरद पवार (Sharad Pawar) -सुप्रिया सुळे (Supriya Sule) एकत्र पाहायला मिळतायत. मनसेचे सरचिटणीस सचिन मोरे यांनी काही फोटोज सोशल मीडियात शेअर केले आहेत . राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला होणाऱ्या विरोधामागे पवारांचा हात होता असं अधोरेखित करण्याचा प्रयत्न मनसेकडून सुरुय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

या फोटोत बृजभूषण सिंह यांच्यासोबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे दिसत आहेत. हे फोटो नेमके कधीचे आहेत याचा उल्लेख यामध्ये केलेला नाही. मात्र मागे असलेल्या बॅनरवरुन हा कुस्तीचा कार्यक्रम असून मावळमध्ये झाल्याचं दिसत आहे. दरम्यान, सचिन मोरे यांच्या या ट्वीट ला राष्ट्रवादीकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

“कुछ लोग डरते है और उस डर को छुपा ने के लिए फोटो मे बहाना ढूँढते है…” घाबरून अयोध्या दौरा रद्द केला, स्वतःचा पळपुटेपणा लपवण्यासाठी राष्ट्रीय कुस्ती संघ आणि राज्य कुस्ती संघ अध्यक्षांचे कुस्ती स्पर्धेत टिपलेले फोटो ट्विट केले(MNS tweeted the photo to hide its runaway).”लेकिन ये पब्लिक है, ये सब जानती है”  असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी प्रत्युत्तर दिले आहे.