मविआच्या नेत्यांनी ओवेसींचे नेतृत्व स्वीकारले तर आम्ही त्यांच्या सोबत जाऊ – जलील 

MP Imtiaz Jalil – कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला 135 जागांसह स्पष्ट बहुमत मिळालं आहे. भाजपाला 66 तर धर्मनिरपेक्ष जनता दलाला 19 जागा मिळाल्या.  2018 च्या तुलनेत काँग्रेसच्या मतदार टक्केवारीत सुमारे पाच टक्क्यांनी वाढ होऊन ती 43 टक्के झाली. तर भाजपाची टक्केवारी किरकोळ घसरुन 36 टक्के राहिली.

दरम्यान, आता या निकालांचे पडसाद महाराष्ट्रात देखील पाहायला मिळत असून भाजपचा पराभव करण्यासाठी सर्वच विरोधी पक्ष प्रयत्न करत आहेत. त्यासाठी विरोधकांची एकजूट करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरु असून यातच आता  एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil) यांनी देखील महाविकास आघाडीसोबत जाण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

जर महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटत असेल आम्ही ताकदवान आहोत, तर त्यांनी आमच्याकडे यावे. खासदर असदुद्दीन ओवेसी यांचे नेतृत्व स्वीकारावे. तर आम्ही त्यांच्या सोबत जाऊ, असं वक्तव्य संभाजीनगरचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी अहमदनगर येथे बोलताना केले आहे. (Latest Marathi News) भाजपला हरवण्यासाठी देशातील जे जे लोक प्रयत्न करत आहेत त्या लोकांसाठी आम्ही आमच्याकडून जी पाहिजे ती कुर्बानी देण्यासाठी तयार आहोत, असंही इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.