यापुढे हे जास्त तोंड उघडुन बरळले तर यांच्या मस्तकावर दगड पडलेच म्हणुन समजा – मिटकरी

अकोला – आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत राहणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar)हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्यावर टीका करताना पडळकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नाशिकमध्ये माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी कांदा परिषद भरवली होती. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीका केली.

पडळकर म्हणाले, ‘दोन वर्षापूर्वी विश्वासघातानी आम्ही विरोधी पक्षात बसलो. विरोधीपक्षामध्ये असलो तरी रडत बसलो नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करत आहोत. इतके वर्ष कांद्याचा प्रश्न का मिटले नाहीत. याच नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांना कांदा प्रश्नावर आंदोलन करत असताना गोळ्या घालण्यात आल्या होत्या. त्यावेळेस शेतकऱ्यांनी रक्त न सांडता इकडे येऊन शरद पवार यांच्या XXXवर लाथ घाला असे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी सांगितले होते. लाथ घातल्यानंतर ते बेशुद्ध पडतील आणि त्यावेळेस त्यांना कांद्याचा वास दाखवा ते शुद्धीवर आल्यानंतर कांद्याचे दर वाढतील, असं वादग्रस्त विधान पडळकर यांनी केलं.

दरम्यान, या टीकेनंतर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी पडळकर आणि या कांदा परिषदेवर टीका केली आहे. कांदा परिषदेत “४” बिना अकलेचे सडके कांदे (Road onions) घुसल्याने उपस्थीत अनेकांनी सभा आटोपल्यावर यां भारतीय (सडक्या मेंदुच्या) कांदा पार्टीला खतरनाक शिव्यांची लाखोळी वाहिल्यामुळे मोठा वांदाच झाला की ओ.. यापुढे हे जास्त तोंड उघडुन बरळले तर यांच्या मस्तकावर दगड पडलेच म्हणुन समजा.