कोरेगाव भीमा प्रकरणी काही दिवसातच पवारसाहेब आयोगासमोर जातील – नवाब मलिक

मुंबई  – येत्या काही दिवसात माझी बाजू मांडण्यासाठी आयोगासमोर येणार असल्याचे पवारसाहेबांनी लेखी पत्राद्वारे कळविले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

भीमा कोरेगाव प्रकरणात पवारसाहेबांना आयोगाने बोलावले होते. परंतु चौकशी आयोगासमोर येता येत नाही. येत्या काही दिवसातच माझी बाजू मांडणार आहे अशी माहिती त्यांनी लेखी पत्राद्वारे कळविले आहे. त्यामुळे पवारसाहेब नक्कीच आयोगासमोर हजर होतील असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

राज्यात जनतेच्या सहकार्याने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश…

दोन वर्षानंतर कोरोनाबाबत दिलासादायक परिस्थिती राज्यात निर्माण झाली असून जनतेच्या सहकार्याने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

राज्यात जवळपास ८०० रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. बहुतेक रुग्ण हे लक्षणे असलेले असले तरी ते होमक्वॉरंटाईन आहेत. मुंबईत डबल डिजिट आकडा आला आहे. ही सगळी परिस्थिती पहाता याबाबत पुढील काळात कोणते निर्देश द्यायचे हे आरोग्य विभाग आणि मदत व पुनर्वसन विभाग प्रस्ताव तयार करतील आणि मुख्यमंत्री टास्क फोर्ससोबत चर्चा करुन अंतिम निर्णय घेतील असेही नवाब मलिक म्हणाले.