हिवाळी अधिवेशनात आमदार किशोर जोरगेवार यांनी विविध महत्वांच्या विषयांकडे वेधले सभागृहाचे लक्ष

MLA Kishore Jorgewar : नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवशेनात आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर मतदार संघातील विविध महत्वाच्या प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले असुन चंद्रपूर जिल्ह्यासह विज उत्पादक जिल्ह्यांना 200 युनिट विज मोफत देण्याची मागणी पुन्हा एकदा त्यांनी अधिवेशनात केली आहे. धानोरा बॅरेजसाठी निधी उपलब्ध करुन देण्याचीही मागणी यावेळी बोलतांना त्यांनी केली आहे.

नागपूर अधिवेशनाच्या सातव्या दिवशी विरोधी पक्षाने आनलेल्या 293 बिलावर बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी मतदार संघातील विविध प्रश्न मांडलेत. यावेळी त्यांनी विदर्भातील सिंचन प्रकल्प गतीमान करण्याची गरज आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 12 माहि वाहणा-या वर्धा नदीवर तिन बॅरेजचा प्रस्ताव प्रस्तावित असुन यामध्ये चंद्रपूर मतदार संघात येणा-र्या धारोरा बॅरेजचाही समावेश आहे. हा प्रकल्प लवकर पुर्ण करण्याची गरज आहे. या प्रकल्पामुळे चंद्रपूर जिल्ह्याला पाण्याचा दुसरा स्त्रोत मिळणार आहे. त्यामुळे शेती, उद्योगाला लागणा-या पाण्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. सदर प्रकल्पाचा सर्व्हे पुर्ण करुन डिपीआरही तयार करण्यात आला आहे. अधिवेशन संपण्याआधी या प्रकल्पाची घोषणा सरकारणे करावी अशी मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

विदर्भात मोठ्या प्रमाणात खनिज साठे आहे. आमच्याकडे कोळश्याच्या जुन्या खानी आहे. सुरजागड येथे आयरन प्रकल्प सुरु आहे. विपूल प्रमाणात खनिज संपत्ती असुन सुध्दा विदर्भ मागास राहिला आहे. सुरजागडला असलेली खान लाँयड एनर्जीला मिळाली आहे. सदर कंपणी येथे निघणार आयरन बाहेर विकण्यावर अधिक भर देत आहे. गुप्ता एनर्जी ला मिळालेली ही कॅपटीव्ह माईन्स आहे. येथे उद्योग उभारण्यासाठी त्यांना ही माईन्स देण्यात आली आहे. मात्र केवळ 10 टक्के आयरन वापरता आणि बाकी आयरन ते बाहेर राज्याला विकत आहे. त्यामुळे याच्यावर बंदी आनण्याची गरज असुन चंद्रपूर गडचीरोली येथे मोठे लोहखनिज प्रकल्प येणे आवश्यक आहे. भिलईच्या धर्तीवर चंद्रपूर गडचीरोली स्टिल नगर करावे अशी मागणी यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी सभागृहात केली आहे. आम्ही आयरन, कोळसा काढत असतांना सरकाने तयार केलेले रस्ते मोठ्या प्रमाणात खराब होत असतात. त्यामूळे येथे कॅरीडोर मार्ग तयार करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली.

50 टक्के वनआच्छादन असुन सुध्दा चंद्रपूर जिल्हा प्रदुषणाच्या बाबतीत भारतातील 4 सर्वाधिक प्रदूषित जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश आहे. हे केवळ जगातील सर्वात प्रदुषीत असलेली औष्णीक विद्युत आम्ही तयार करत असल्यामुळे आहे. साडेपाच हजार मेगावॅट विजेची निर्मिती चंद्रपूर जिल्ह्यात होते. परंतु त्याचा मोबदला आम्हाला काहीही मिळत नाही. प्रदुषणामुळे चंद्रपूरकरांचे आयुष्यमान 5 ते 10 वर्षानी कमी झाले आहे. अनेक रोगाने चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक त्रस्त आहे. त्यामुळे आम्ही 3 हजार मोटार सायकलीची रॅली नागपूरात घेउन आलो. यात सात हजार लोक सहभागी झाले. आम्हची साधी मागणी आहे. या औष्णिक विद्युत केंद्रातुन होणा-या प्रदुषणाचा मोबदला म्हणून आम्हाला घरगुती वापराची 200 युनिट विज मोफत देण्यात यावी, रोजगार आणि उद्योग वाढीसाठी उद्योगांना सवलतीच्या दरात विज देण्यात यावी, शेतीला मोफत विज देण्यात यावी अशी मागणी यावेळी पून्हा एकदा आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. हे केले नाही. तर भविष्यात या विज उत्पादक जिल्ह्यांमध्ये मोठे जन आंदोलन उभे राहुन नागरिक हे विज प्रकल्प बंद पाडतील असेही यावेळी सभागृहात आमदार जोरगेवार म्हणाले.

एकेकाळी चंद्रपूर जिल्ह्यात धान हे प्रमुख पिक होते. परंतु आता या जिल्ह्यात कापूस पिक मोठ्या प्रमाणात घेतल्या जात आहे. मात्र कापसाच्या सुत गिरण्या आमच्या जिल्ह्यात नाही. त्यामुळे आम्हाला प्रदुषण देणारे उद्योग न देता सहकारी तत्वावर शासनाने कापसावर आधारीत, सोयाबीन वर आधारीत कृषी मालावर आधारीत उद्योग देण्याची मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. चंद्रपूरच्या दिक्षाभुमीच्या विकासासाठी 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणीही यावेळी बोलतांना पुन्हा एकदा आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

चंद्रपूर जिल्हा हा वाघांचा जिल्हा आहे. येथील वनांच आणि वाघांचे आम्ही संवर्धन करत असतांना आम्हाला अपेक्षीत अस काहीही मिळत नाही. त्यामुळे पर्यटनासाठी म्हणून स्थानिक लोकांना रोजगार मिळेत अशा पध्दतीचे वन पर्यटनाचे वनावर आधारीत उद्योग येथे निर्माण करण्यात यावे. पर्यटनासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात यावी, छोट्या उद्योगांना कोळसा उपलब्ध करुन देण्यात यावा, चंद्रपूर येथे नव्या तहसील कार्यालयाचे निर्माण करण्यात यावे, चंद्रपूरचा पर्यटन क्षेत्र म्हणून सुद्धा विकास करण्यात यावा, येथील महाकाली मंदिराच्या विकासासाठी येणा-र्या अडचणी दुर करुन याचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करण्याची मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.