क्रिकेटपटू Yuvraj Singh भाजपकडून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात? स्वत:च सांगितलं

Yuvraj Singh Lok Sabha Election Gurdaspur: माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग (Yuvraj Singh) आगामी लोकसभा निवडणुकीत गुरुदासपूर मतदारसंघातून भाजपचा उमेदवार असेल? सिक्सर किंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या युवराज सिंगने राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आहे का? युवराज सिंग लोकसभा निवडणूक लढवणार का? गेल्या काही दिवसांपासून युवीबाबत अशा अनेक बातम्या येत होत्या. आता यावर युवराजचे स्वतःचे वक्तव्य समोर आले आहे. युवराजने लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत प्रत्युत्तर दिले आहे. जाणून घ्या, गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबद्दल युवी काय म्हणाला?

भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक असलेल्या युवराज सिंगने शुक्रवारी राजकारणात प्रवेश करून पंजाबमधील गुरुदासपूर मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचे सर्व वृत्त फेटाळून लावले. गरजू लोकांना अनेक प्रकारे आधार देणे आणि त्यांना मदत करणे हा त्याचा ध्यास आहे, जो त्याच्या संस्थेच्या माध्यमातून सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या त्याची राजकारणात येण्याची इच्छा नाही.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

42 वर्षीय युवराज सिंगने शुक्रवारी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केले की, मीडिया रिपोर्ट्सच्या विरोधात, मी गुरुदासपूरमधून निवडणूक लढवत नाही. गरजू लोकांना विविध माध्यमे आणि क्षमतांद्वारे आधार देणे आणि मदत करणे ही माझी आवड आहे आणि मी माझ्या ‘YouWeCan’ या संस्थेद्वारे हे करत राहीन.

महत्वाच्या बातम्या : 

विधिमंडळाच्या लॉबीत सत्ताधारी आमदारांची धक्काबुक्की महाराष्ट्राला लाज आणणारी: Nana Patole

Sambhaji Bhide: संभाजी भिडेंच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न, काळे झेंडेही दाखवले

Muralidhar Mohol | मोहोळांनीही उघडले लोकसभेचे पत्ते; म्हणाले, ‘मी लोकसभेची तयारी करतोय, पण…’