राज्यात दलितांवर अन्याय – अत्याचार झाल्यास आक्रमकपणे न्यायासाठी लढा द्या – रमेश बागवे

पुणे  – दलीत समाजावर (Dalit Society) विशेष करून मातंग समाजावर अन्याय अत्याचार सातत्याने होत आहेत .त्यासाठी आता कार्यकर्त्यांनी सज्ज झाले पाहिजे , दलीत समाजावर अन्याय अत्याचार झाल्यास अतिशय आक्रमकपणे कार्यकर्त्यांनी न्याय मिळण्यासाठी लढा उभारला पाहिजे असे आवाहन  मातंग समाजाच्या राज्यव्यापी निर्धार परिषदेत माजी मंत्री व मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक रमेश बागवे (Ramesh Bagve) यांनी केले. पुढे ते म्हणाले की ,राज्यात दलितांवर कुठे अन्याय झाल्यास आपण आक्रमकपणे त्याला विरोध करून, पीडितांना न्याय मिळण्यासाठी लढा दिला पाहिजे .

मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेची आज निर्धार परिषद पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे यानी कार्यकर्त्यांना सखोल मार्गदर्शन केले. निर्धार परिषदेसाठी महाराष्ट्र राज्यातील संघटनेचे जिल्हाध्यक्ष, तालुकाअध्यक्ष, शहराध्यक्ष, महिला व युवक आघाडीचे  पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागील ३ वर्षाच्या कालावधी मध्ये कोरोनाच्या महामारी मुळे संघटनेची वार्षिक बैठक होउ शकली नव्हती यामुळे निर्धार बैठकीसाठी संघटनेचे पदाधिकारी आवर्जुन उपस्थित होते.

यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करते समयी आदरनीय रमेश दादा बागवे यांनी संघटनेच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांनी एकजूट करून या पुढील काळात संघटनेचा विस्तार गावोगावी, खेडोपाडी जाऊन केला गेला पाहिजे. समाजावर जे वाढते अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी एकसंघ राहणे अत्यंत गरजेचे आहे. मातंग समाज हा राज्यातील सर्वात मोठा दोन नंबरचा लोकसंख्या असलेला समाज असून केवळ आपसातील गटामुळे व विस्कळीतपणा मुळे आपल्यावर होणारे अन्याय-अत्याचार मध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. जर आपण एकजूट नाही झालो तर भविष्यात समाजाला आणखी वाईट दिवस येतील. या करिता आजपासूनच विस्तारासाठी सर्व जिल्हाध्यक्षांनी आपापल्या भागांमध्ये काम करणे काळाची गरज आहे. प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये विभाग निहाय मेळाव्याचे आयोजन  करावे आम्ही सर्वजण तुम्हास आवश्यक ती मदत करण्यास व सहकार्य करण्यास सतत तयार आहोत. महिला आघाडीच्या व युवक आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा या सर्व संघटनेच्या नियम व अटींचे पालन करून संघटना बळकट करण्यासाठी हातभार लावणे तितकेच महत्त्वाचे आहे.

संघटना ही आपली आई आहे आणि आपण त्याप्रमाणेच संघटनेवर प्रेम केले पाहिजे याचे भान ठेवून राज्यात काम केले पाहिजे असे कळकळीचे आव्हान माननीय बागवे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून पदाधिकाऱ्यांना उद्देशून आव्हान केले. याप्रसंगी संघटनेचे कार्याध्यक्ष माजी नगरसेवक माननीय अविनाश बागवे (Avinash Bagve) यांनीही  कार्यकर्त्यांना सखोल मार्गदर्शन केले. संघटनेचे राज्याचे पदाधिकारी माननीय अशोकराव कांबळे ,एडवोकेट एकनाथ सुगावकर,मुख्य समन्वयक विठ्ठल राव थोरात, महिला आघाडीच्या ऍड. राजश्री अडसूळ, जिल्हाध्यक्ष अलकाताई सकट, सरचिटणीस सुरेखाताई खंडाळे, यांचीही मार्गदर्शनपर भाषणे झाली. विस्तारासाठी यापुढील काळात प्रयत्न करत असल्याचेे आश्वासन देऊन सर्व राज्यातील कार्यकर्त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या या  निर्धार बैठकीमध्ये  उपस्थित सर्व जिल्हाध्यक्षांनी आपापल्या जिल्ह्यातील  संघटनेच्या कार्यात येणाऱ्या  अडीअडचणी नेतेमंडळी च्या समोर मांडण्यात आल्या.

उपस्थित जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष यांना नवीन पदाचे वाटप उपस्थित प्रमुख मान्यवर व्यक्तींच्या शुभहस्ते देण्यात आले. चंद्रकांत काळोखे, रामभाऊ वाघमारे ,शिवाजी घुले, अनिल निर्भवणे, अलका सकट, सुरेखा खंडाळे अशा एकूण 25 नविन  पदाधिकाऱ्यांना नवीन पदभार देण्यात आला. बैठकीसाठी मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते माननीय प्र.बा.सोनवणे, यादवराव सोनवणे प्रामुख्याने उपस्थित होते.प्रास्ताविक श्री अरुण गायकवाड यांनी केले तर आभार संजय साठे यांनी मानले या निर्धार बैठकीसाठी राज्यातील सोशल मीडिया ची स्वतंत्र टीम तयार करून त्यांनाही नवीन पदाचे वाटप संघटनेच्या प्रमुख नेतेमंडळींच्या शुभ हस्ते देण्यात आले