देशातील पहिल्या बिटकॉइन घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करा, पुण्यातील तक्रारदार आले समोर

पुणे : देशातील पहिला बिटकॉइन फसवणूक घोटाळा पुण्यात घडला. त्यानंतर या घोटाळ्यातील आरोपीला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर या गुन्ह्याची उकल करण्यासाठी तांत्रिक विश्लेषकाची मदत घेतली. मात्र तांत्रिक विश्लेषक म्हणून काम करणाऱ्या पंकज घोडे आणि माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील यांनीच तपासाच्या नावाखाली आरोपीकडून जप्त करण्यात आलेले बिटकॉइन स्वतःच्या खात्यात वळते करून घेतले.

ही चोरी उघड झाल्यानांतर या दोघांना अटक करण्यात आली. या प्रकरणातील सर्व तक्रारदार हे एकत्र आले असून देशातील पहिला बिटकॉइन फसवणूक प्रकरणाची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी व्हावी अशी मागणी यावेळी या तक्रारदारांकडून करण्यात आली आहे. तसेच हे प्रकरण 2017 पासून असून यात पुणे शहरातील विविध तक्रारदारांकडून तब्बल 2500 हुन अधिक बिटकॉइन बाबत तक्रार नोंदविण्यात आली आहे.

दरम्यान , देशातील पहिला बिटकॉईन घोटाळा पुण्यात उघड झाला आहे. या घोटाळ्याचा उलगडा करता असताना पोलिसांनी तांत्रिक साह्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली होती. यासाठी पोलिसांनी सायबर तज्ज्ञ म्हणून पंकज प्रकाश घोडे आणि रवींद्र प्रभाकर पाटील यांची नेमणूक केली होती. मात्र या घोटाळ्याचा तपास करत असताना पोलिसांना तपासात मदत करणाऱ्या माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील यानेच तब्बल 75 कोटी रुपयांचे 240आरोपीकडील बिटकॉईन हडप केल्याचे समोर आले आहे.

गुन्ह्यात पोलिसांनी मदत घेतलेल्या केपीएमजी कंपनीचा भागीदार व माजी आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील यांच्याकडून पोलिसांनी आतापर्यंत 6 कोटी रूपयांचे बिटकॉईन व इतर चलन जप्त केले आहेत.बिटकॉईन च्या रक्कमेतून आरोपी पाटीलने आलिशान फ्लॅट व महागड्या गाड्याची खरेदी केली आहे.