हार्दिक पंड्याची मुंबई इंडियन्समध्ये घरवापसी, सोशल मीडिया पोस्टद्वारे स्वत:च दिली माहिती

Hardik Pandya Mumbai Indians: हार्दिक पांड्या पुन्हा एकदा मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आहे. मुंबईने पंड्याचा आयपीएल 2024 च्या संघात समावेश केला आहे. हार्दिक यापूर्वी गुजरात टायटन्ससोबत (Gujrat Titans) होता. कर्णधार म्हणून त्याने संघाला चॅम्पियन बनवले आहे. पण आता तो मुंबईत परतला आहे. पुनरागमनानंतर संघाची जर्सी घातलेला एक फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावर चाहत्यांकडून अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

हार्दिकला 2022 मध्ये गुजरातचा कर्णधार बनवण्यात आले होते. हा मोसम त्याच्यासाठी खूप चांगला होता. पंड्याने 15 सामन्यात 487 धावा केल्या होत्या. त्याने 4 अर्धशतके झळकावली होती. यानंतर पांड्याने 2023 मध्ये 16 सामने खेळले आणि या काळात त्याने 346 धावा केल्या. पंड्याने 2 अर्धशतके झळकावली होती. कर्णधार म्हणून त्याने 2022 मध्ये संघाला चॅम्पियन बनवले. तर 2023 मध्ये संघाने अंतिम फेरी गाठली होती. IPL 2023 चा अंतिम सामना गुजरात आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला गेला होता.

हार्दिकने सोशल मीडियावर एक व्हिडिओही शेअर केला आहे. त्याची कारकीर्द यात दाखवण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये हार्दिकचे अनेक फोटो दिसत होते. पांड्याच्या पोस्टवर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. मुंबईच्या चाहत्यांनी पंड्याचं स्वागत केलं आहे. अनेक सोशल मीडिया यूजर्सनी त्याला ट्रोलही केले आहे.

हार्दिक पांड्याची आतापर्यंतची कारकीर्द चांगली आहे. त्याने 123 आयपीएल सामन्यात 2309 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 10 अर्धशतके झळकावली आहेत. पांड्याने 53 विकेटही घेतल्या आहेत. 17 धावांत 3 बळी ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आहे. पंड्याने 2015 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याला या मोसमात केवळ 3 डावात फलंदाजीची संधी मिळाली. हार्दिकने 112 धावा केल्या होत्या. यात एका अर्धशतकाचा समावेश होता.

महत्वाच्या बातम्या-

आगामी टी२० विश्वचषकात हार्दिक पंड्याकडे नेतृ्त्व देऊ नये, ‘हा’ खेळाडू असेल सर्वोत्तम पर्याय

अमिताभ बच्चन यांनी मुलीला भेट दिला ५६ कोटींचा बंगला, आता ‘बिग बी’ कुठे राहणार?

दादासमोर नाक उचलून…; रुपाली चाकणकरांचा कवितेतून सुप्रिया सुळेंवर निशाणा