हार्दिक गेल्याने गुजरात टायटन्सला मिळाला नवा कर्णधार, ‘या’ बहाद्दर खेळाडूवर संघाने ठेवला विश्वास

IPL 2024 Update:  इंडियन प्रीमियर लीग (IPL) साठी एक मोठी बातमी समोर आली आहे. गुजरात टायटन्स (GT) ने आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. टीम इंडियाचा स्टार सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) आता आयपीएलच्या आगामी मोसमात गुजरात टायटन्सचे नेतृत्व (Gujrat Titans New Captain) करणार आहे. हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्समध्ये (MI) गेल्यानंतर गुजरात टायटन्सने हा मोठा निर्णय घेतला आहे.

गुजरात टायटन्सचे क्रिकेट संचालक विक्रम सोलंकी म्हणाले, ‘शुबमन गिलने गेल्या दोन वर्षांत खेळाच्या सर्वोच्च स्तरावर लक्षणीय प्रगती केली आहे. फक्त एक फलंदाज म्हणून नव्हे तर क्रिकेटमध्ये एक नेता म्हणूनही त्याला आपण परिपक्व पाहिले आहे. मैदानावरील त्याच्या योगदानामुळे गुजरात टायटन्सला एक मजबूत शक्ती म्हणून उदयास येण्यास मदत झाली आहे. त्याची परिपक्वता आणि कौशल्य त्याच्या मैदानावरील कामगिरीमध्ये स्पष्टपणे दिसून येते. त्याला कर्णधार बनवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’

कर्णधार बनल्यावर गिलने हे मोठं वक्तव्य दिलं
कर्णधार होण्याबाबत शुभमन गिल म्हणाला, ‘गुजरात टायटन्सचे कर्णधारपद स्वीकारताना मला आनंद होत आहे. एवढ्या चांगल्या संघाचे नेतृत्व करणे ही मोठी गोष्ट आहे. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी फ्रँचायझीचे आभार मानतो. आमच्याकडे दोन आश्चर्यकारक हंगाम अनुभवरुपी आहेत.’ गुजरात टायटन्सने 2022 आणि 2023 हंगामात भाग घेतला होता. त्यांच्या पदार्पणाच्या मोसमातच त्याने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावले. गेल्या मोसमात ते उपविजेते ठरले होते.

महत्वाच्या बातम्या-

आगामी टी२० विश्वचषकात हार्दिक पंड्याकडे नेतृ्त्व देऊ नये, ‘हा’ खेळाडू असेल सर्वोत्तम पर्याय

अमिताभ बच्चन यांनी मुलीला भेट दिला ५६ कोटींचा बंगला, आता ‘बिग बी’ कुठे राहणार?

दादासमोर नाक उचलून…; रुपाली चाकणकरांचा कवितेतून सुप्रिया सुळेंवर निशाणा