Jyoti Waghmare | सुप्रियाताईंना बाहेरच्या म्हटलं तर चालणार आहे का? ज्योती वाघमारेंना शरद पवारांना थेट सवाल

Jyoti Waghmare | बारामती लोकसभा मतदार संघातील सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे या लढतीकडे देशाचे लक्ष लागले आहे. शरद पवारांच्या होम ग्राऊंड वरील मुलगी विरुद्ध सून या लढतीचे प्रचारा दरम्यान दोन्ही बाजुच्या कार्यकर्त्याकडून जोरदार समर्थन होत आहे, अशातच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांना बाहेरच्या असे संबोधल्याने वाद निर्माण झाला असून शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी पवारांच्या या वक्तव्यावर संताप व्यक्त करत पवार साहेब सुप्रिया सुळे बाहेरच्या म्हटलं तर चालणार आहे का ? असा सवाल उपस्थित केला आहे.

बारामती लोकसभा मतदार संघात प्रचारा दरम्यान शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांना बाहेरच्या उमेदवार म्हंटले होते. यावर बोलताना शिवसेनेच्या ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांनी म्हंटले आहे की, पवार साहेब आपणही एका मुलीचे बाप आहात, आपली ही मुलगी सुळे यांच्या घरात सून म्हणून गेलेली आहे, तर मग सुप्रिया ताई सुळे यांना कुणी बाहेरची म्हटलं तर ते तुम्हाला आवडेल का? तुमची लेक म्हणजे माहेरची आणि दुसऱ्याची लेक म्हणजे बाहेरची? असा तुमचा न्याय आहे का? कुठलीही मुलगी जेंव्हा उंबऱ्यावरचं माप ओलांडून सासरी येते ना तेंव्हा स्वतःच्या सर्व सुखाचे समर्पण करते त्या परिवाराच्या सुखासाठी. मग अशा सुनाना बाहेरची म्हणणे महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसे आहे का?

औरंगजेबाल याच मातीत गाडणाऱ्य महाराणी ताराबाई भोसले राणीबाई साहेब या भोसले घराण्याच्या सूनच होतया, ज्यांचा प्रत्यक्ष संभाजी महाराजांनी स्त्री, सखी, रागिणी, जयती असा गौरव केला त्या महाराणी येसुबाईसाहेब या शिवाजी महाराजांच्या सून नव्हत्या का? आणि एक नव्हे तर दोन – दोन छत्रपती घडवणाऱ्या राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब या सुद्धा भोसले घराण्यांमध्ये सून म्हणूनच आल्या होत्या. स्त्रियांच्या शिक्षणासाठी महात्मा फुलेंच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई या सुद्धा फुले घराण्याच्या सुनाबाईच होतया. त्याचा बरोबर संविधान निर्मितीची प्रेरणा बनणाऱ्या, बाबासाहेबांसाठी कणकण झिजणाऱ्या त्यागमूर्ती माता रामाई या सुद्धा रामजी बाबांच्या सुनाबाई म्हणूनच आंबेडकर घराण्यांमध्ये आल्या होतया. त्यामुळे सूनांना बाहेरची म्हणून पवार साहेब तुम्ही फक्त सुनेत्रा वाहिनींचा नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम लेकिबाळींचा अपमान केला आहे हे महाराष्ट्र विसरणार नाही.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Loksabha Election 2024 | राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात; चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार सर्वाधिक

Eknath Shinde | स्वार्थासाठी राजकीय आखाडे बदलणारे पहिलवान मोहोळांसमोर टिकणार नाहीत

Amit Shah | औरंगाबाद,उस्मानाबादच्या नामांतरास शरद पवार विरोध करत होते