Yogesh Khaire | “सूनेला अजूनही ‘बाहेरून आलेली’ असा दर्जा देणं…”, मनसेचा शरद पवारांवर घणाघात

Yogesh Khaire On Sharad Pawar | बारामती लोकसभा मतदारसंघात पवार काका-पुतण्यामध्ये सुरू असणारा राजकीय संघर्ष आणखीन वाढताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी बारामतीमध्ये बोलत असताना “बारामतीकरांनी साहेबांना निवडून दिलं, लेकीला निवडून दिलं आता सुनेला निवडून द्यावं, बारामतीकर हे कायम पवार नावाच्या पाठीमागे उभे राहतात” असे विधान केलं होत. अजितदादांच्या या विधानाचा समाचार घेत ‘मूळचे पवार आणि बाहेरून आलेल्या पवारांमध्ये फरक आहे’ म्हणत शरद पवारांनी सुप्रिया सुळे या मूळ तर सुनेत्रा पवार या विवाहानंतर पवार झाल्याचे अप्रत्यक्षरीत्या दर्शवण्याचा प्रयत्न केला. शरद पवारांच्या विधानावर आता मनसे चांगलीच आक्रमक झाल्याचं दिसत आहे.

मनसेचे प्रवक्ते आणि सचिव योगेश खैरे (Yogesh Khaire) शरद पवारांवर निशाणा साधला आहे. सूनेला ‘बाहेरून आलेली’ असा दर्जा अजूनही दिला जाणं. तिला त्या घरातील न समजणं अशा प्रकारचं वक्तव्य शरद पवार साहेबांनी केलंय ! हे पुरोगामीत्वपणाचं लक्षण नक्कीच नाही !!, असे घणाघाती ट्विट योगेश खैरे यांनी केले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Loksabha Election 2024 | राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात; चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार सर्वाधिक

Eknath Shinde | स्वार्थासाठी राजकीय आखाडे बदलणारे पहिलवान मोहोळांसमोर टिकणार नाहीत

Amit Shah | औरंगाबाद,उस्मानाबादच्या नामांतरास शरद पवार विरोध करत होते