एवढ्या मोठ्या राज्यपाल पदावर असलेल्यानी बोलताना तारतम्य बाळगणे गरजेचे आहे; मनसेचा हल्लाबोल 

Mumbai – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) हे कोणत्या ना कोणत्या विधानामुळे कायम चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षान्त समारंभात Dr. 62nd convocation ceremony of Babasaheb Ambedkar Marathwada University) बोलताना त्यांना शिवाजी महाराबाबत वादग्रस्त विधान केले होते.

दरम्यान, आता मनसेनेही या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यपालांचं वय झालं आहे. त्यांना तात्काळ रिटायर करा, अशी मागणी मनसेने केली आहे. साठी बुद्धी नाठी ही म्हण अशा लोकांमुळेच पडली असेल. जिभेला जरी हाड नसेल तरी डोक्यात मेंदू असतो. एवढ्या मोठ्या राज्यपाल पदावर असलेल्यानी बोलताना तारतम्य बाळगणे गरजेचे आहे. या आधीही यांनी वारंवार भावना दुखविण्याचे काम केले आहे. यांच्या वरिष्ठांनी यांना आता दुसरीकडे पाठवायला हवे. असं मनसेचे जेष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले राज्यपाल?
‘आम्ही जेव्हा शिकत होतो, ते आम्हाला विचारत होते, तुमचा आवडता हिरो कोण आहे. आम्ही त्यावेळी सुभाषचंद्र बोस, नेहरू, गांधी जे चांगले वाटत असेल त्यांची नाव सांगत होतो. पण, आता महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील, शिवाजी तर जुने झाले आहे. नवीन काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत हिरो इथंच मिळतील’ असं म्हणत राज्यपालांनी महापुरुषांची तुलना गडकरी आणि पवारांसोबत केली.