Jaya Bachchan | ‘मूर्ख आहेत ‘त्या’ मुली ज्या डेटवर जाऊन…’ नातीच्या पॉडकास्टमध्ये जया बच्चन काय बोलून गेल्या?

Jaya Bachchan On Dating: जया बच्चन (Jaya Bachchan) अशा सेलिब्रिटींपैकी एक आहेत ज्या कोणत्याही विषयावर आपले स्पष्ट मत व्यक्त करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. यासाठी त्यांना रोषाला सामोरे जावे लागले तरी चालेल. आता त्यांनी म्हटले आहे की त्या महिला आणि मुली मूर्ख आहेत, ज्या डेटवर जातात आणि नंतर बिल विभाजित करतात. फक्त पुरुषांनीच बिल भरावे, असे जया म्हणाल्या.

जया बच्चन यांनी नात नव्या नवेली नंदाच्या पॉडकास्ट शो व्हॉट द हेल नव्याच्या दुसऱ्या सीझनच्या ताज्या एपिसोडमध्ये असे वक्तव्य केले. या एपिसोडमध्ये नेहमीप्रमाणे जया तिची मुलगी श्वेता नंदासोबत होत्या.

नव्या नवेली नंदा डेटिंग आणि बिल विभाजनावर बोलली
नव्या नवेली नंदा हिने स्त्रीवादावर भाष्य केले आणि महिलांना आता अधिक सक्षम वाटत असल्याचे सांगितले. तिला अनेक गोष्टी स्वतंत्रपणे करायच्या आहेत. त्यानंतर तिने उदाहरण दिले की, जर तुम्ही एखाद्या मुलीला डेटवर घेऊन गेलात आणि तुम्ही बिल भरू असे म्हटल्यास, काही लोक यामुळे नाराज होतात, कारण महिलांना त्याचा तितकाच अधिकार वाटतो.

पण नव्याने काही बोलण्याआधीच जया बच्चन (Jaya Bachchan) म्हणाल्या की, ज्या महिला अर्धे-अर्धे बिल देतात, त्या मूर्ख आहेत. जया म्हणाल्या, ‘किती मूर्ख आहेत त्या महिला ज्या डेटवर स्वत: बिल भरतात किंवा ते पार्टनरसोबत अर्धे-अर्धे विभाजीत करुन भरतात. त्यापेक्षा पुरुषांना बिल भरण्याची मुभा द्यावी.’

यानंतर नव्याने आजी जया बच्चन आणि आई श्वेता नंदा यांना विचारले की त्यांच्या काळात आणि आजच्या काळात पुरुषांमध्ये काही बदल झाला आहे का? म्हणजे त्यांच्या काळात ते कसे होते आणि आज कसे आहेत? याला उत्तर देताना श्वेता बच्चन नंदा म्हणाल्या, ‘आमच्या काळात माणसाने बलवान असावे आणि स्त्रीने गप्प राहावे, असा समज होता. आपण डेटिंग करत असताना देखील, त्या व्यक्तीची प्रतीक्षा करावी. तो तुमच्याकडे येऊन प्रपोज करेल. जया बच्चन यांनीही ही गोष्ट मान्य केली. त्या म्हणाल्या, ‘पुरुषाने आधी प्रपोज केले तर बरे होईल. अन्यथा, मला खूप विचित्र वाटते.’

महत्वाच्या बातम्या-

‘या’ दिवशी मुंबई इंडियन्स खेळणार आयपीएल २०२४चा पहिला सामना, पाहा पंड्याचे संघाचे वेळापत्रक

Sharad Pawar | सगळं दिलं पण पाच टक्केही निष्ठा पाळली नाही, शरद पवार यांचा हल्लाबोल

मुळशी धरणाची उंची वाढविण्याचे Ajit Pawar यांचे निर्देश; मुळशी परिसरासह पुण्याच्या पश्चिम भागाला अतिरिक्त पाणी मिळणार