Sunil Tatkare | जयंत पाटील… शेकापला तुम्हीच लोकसभेतून हद्दपार केलात, सुनील तटकरे स्पष्टच बोलले

Sunil Tatkare | बरं झालं… जयंत पाटील तुम्ही शरद पवारांना इथे आणलात. एका छोट्याशा गावामध्ये राष्ट्रीय नेतृत्वाला आणलंत आणि आमची ताकद किती आहे हे तुम्हाला मान्य करावं लागले आहे असा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी शेकापचे नेते जयंत पाटील यांना लगावला.

म्हसळा, श्रीवर्धन येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक मेळावे झाल्यानंतर माणगाव तालुक्यातील मोर्बा या गावी रात्री महायुतीचा अल्पसंख्याक मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. येथे सुनिल तटकरे बोलत होते.माझ्या प्रचाराला राष्ट्रीय पातळीवरील नेता अजून आणला नाही. माझी महायुती भक्कम आहे. पण तुम्हाला पवारसाहेबांची आठवण आली अशी उपरोधिक टिका सुनिल तटकरे यांनी केली. जयंत पाटील तुमचं भाषण मी थोडंसं ऐकलं. तुम्ही, जितेंद्र आव्हाड असतील या जगात खोटे बोलणारे कोण असतील तर हे दोघेजण आहेत असा थेट आरोप सुनिल तटकरे यांनी भरसभेत केला.

तुम्ही शेकापचे प्रदेश सरचिटणीस झालात आणि १९५२ पासून या जिल्हयात लोकसभेच्या निवडणुका झाल्या तिथपासून कॉंग्रेस आणि तुमच्यात लढत झाली. तुम्ही नेतृत्व घेतलात आणि या जिल्हयातून शेकाप हद्दपार झाला. २००९ मध्ये शेकाप निवडणूकीत गेलात आणि तुम्ही शिवसेनेची लाचारी करत गेलात तुम्ही उमेदवारांना पाठिंबा दिलात. रायगड आणि मावळ मतदारसंघात चार आमदारांची बेगडी तुम्ही शिवसेनेच्या पदरात पाडलीत. म्हणून तुम्हाला विधानसभेत यश मिळाले याची आठवण सुनिल तटकरे यांनी करुन दिली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांचा सहाही विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा धुराळा, विविध समाजघटकांकडून स्वागत

Amol Kolhe | दिल्लीचे तख्त पलटवण्याची ताकद महाराष्ट्राच्या मनगटात आहे

Sunil Shelke On Rohit Pawar: रोहित पवारांना अजितदादांची जागा घ्यायचीय, सुनील शेळकेंचा निशाणा