चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली अजित पवारांची भेट! राजकीय चर्चांना आले उधाण 

Mumbai – महाराष्ट्रात विधान परिषदेच्या १० जागांसाठी सोमवारी म्हणजेच आज मतदान होत आहे. या निवडणुका 10 दिवसांपूर्वी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणेच रंजक ठरण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत इतर पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपले उमेदवार उभे केले असले तरी मुख्य लढत काँग्रेसच्या दुसऱ्या आणि भाजपच्या पाच उमेदवारांमध्ये आहे.ही निवडणूक देखील रंजक असेल कारण मतदान गुप्त असेल, त्यात कोणाला मतदान केले हे शोधणे कठीण होईल.

विशेष म्हणजे गुप्त मतदानावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेतही खडाजंगी झाली आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत, ज्यामध्ये MVA शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांनी प्रत्येकी दोन आणि भाजपने पाच उमेदवार उभे केले आहेत. प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी किमान २६ मतांची आवश्यकता आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडी एका बाजूला घडत असताना आज एक लक्ष्यवेधी घटना घडली  भारतीय जनता पक्षाचे (BJP) वरिष्ठ नेते आणि माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतली. विधान परिषदेसाठी मतदाना सुरू असताना बावनकुळे यांनी ही भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.  (Chandrashekhar Bavankule met Ajit Pawar)

अजित पवार यांच्या दालनात उपस्थित असलेल्या एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्याशीही आमदार बावनकुळे यांनी चर्चा केली. दरम्यान, अजितदादांसोबतची आपली भेटी ही राजकीय नव्हती. तर ती मतदारसंघातील कामांसदर्भात होती, असे स्पष्टीकरण आमदार बावनकुळे यांनी भेटीबाबत दिले आहे. मात्र, त्यांच्या या अचानक भेटीमुळे राजकीय संभ्रम मात्र निर्माण झाला आहे.