पोलीस नातवांना सांगतात, तुमची जिंदगी बरबाद झाली; ललित पाटीलच्या वडिलांचा आरोप

Lalit Patil दोन आठवड्यांपूर्वी ससून रुग्णालयातून (Sasun Hospital) पलायन केलेल्या ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) बंगळुरु इथून अटक केल्यानंतर त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. नाशिक इथल्या अमली पदार्थ तस्करी (Drug trafficking) प्रकरणात आरोपी असलेल्या ललितला मुंबईतल्या एका व्यक्तिकडून कच्चा माल मिळत होता, त्यालाही अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणात पुणे पोलिसांनी ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना नाशिकमधून (Nashik News) अटक केली आहे. या सर्व घडामोडी घडत असताना दुसऱ्या बाजूला आता हजारो तरुणांचे आयुष्य बरबाद करणाऱ्या ललित पाटीलच्या वडिलांची प्रतिक्रिया आता समोर आली आहे.

आम्ही जन्म दिला त्याला, हा आमचा गुन्हा आहे का? आम्ही काय केलंय असं? आई-बापांनी जन्म दिला हा गुन्हा नाहीय ना. मी फार टेन्शनमध्ये आहे. तो तीन वर्षांपासून तुरुंगात आहे. आम्ही त्याला भेटायला गेलो नाही, असं ललितचे वडील म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, “पोलीस येथे येऊन आम्हाला त्रास देत आहेत. मला लहान लहान नातू आहेत, त्यांना म्हणतात तुमची जिंदगी बरबाद झाली. असं म्हणायची काय गरज आहे का?”, असा आर्त सवाल ललितच्या वडिलांनी केला आहे.

https://youtu.be/tr2tvuJfQq4?si=M8a1sEkkAwwC09hl

महत्वाच्या बातम्या-

सत्य विरुद्ध सत्ता च्या लढाईसाठी राष्ट्रवादी सज्ज; शरद पवारांनी घेतला सात लोकसभा मतदार संघाचा आढावा

ललितने सात किलो चांदी न नेता फक्त पंचवीस लाख रुपयांची रोख रक्कम नेत केले पलायन ?

शरद पवार सुप्रिया सुळे यांना हमासच्या बाजूने लढण्यासाठी गाझाला पाठवतील – सरमा