‘भीमाची माझ्या राजाची, जयंती आहे वाघाची’; जयभीम शिंदे यांचे नवीन भीमगीत प्रक्षेकांच्या भेटीला 

परंडा  –  आंबेडकरी चळवळ संगीत क्षेत्रात नवनवीन प्रयोग करणारे आणि भीमगीतांना वेगळी उंची देणारा गायक, संगीतकार डॉ. जयभीम शिंदे (Jaibhim Shinde ) यांचं नवीन भीमगीत (BheemGeet) प्रक्षेकांच्या भेटीला आले आहे. ‘भीमाची माझ्या राजाची, जयंती आहे वाघाची’ असं नवीन गाण्याचं नाव असून, स्वतः डॉ. जयभीम शिंदे यांनी गायण केले आहे.

याआधी देखील अनेक प्रसिद्ध गाण्याचे लिखाण व गायन जयभीम शिंदे यांनी केले आहे.  नाविन्यपूर्ण गीतरचना आणि उत्कृष्ट संगीत ही या गाण्याची जमेची बाजू आहे. हे गाणं स्वतः डॉ. जयभीम शिंदे यांनी लिहिलं असून त्याचं संगीत आणि गायन स्वतः च केले आहे. मानवता निर्मिती मंच आणि डॉ. जयभीम शिंदे यांची निर्मिती असलेल्या या गाण्याला प्रकाश शिंदे,प्रीतेश हिवाळे व संदेश शिंदे यांनी वादन केले आहे.

आंबेडकर चळवळीत जनजागृती साठी आजपर्यंत ३ हजार पेक्षा जास्त कार्यक्रम गावोगावी जाऊन अमूल्य योगदान देऊन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जतन व संवर्धन केले आहे. डॉ. जयभीम शिंदे हे शाहीर तर आहेतच त्याचबरोबर उत्तम कवी- गीतकार-संगीतकार , उत्कृष्ट व्यवस्थापक व संघटक आणि उत्तम गायक आहेत. त्यांनी एकूण ३ हजार कार्यक्रमांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला. भीम जलसा या त्यांच्या नावीन्यपूर्ण सर्जनशील तथागत गौतम बुध्द, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित १५० ते २०० भीमगीते, पोवाडे, लोकप्रबोधन इत्यादींच्या माध्यमातून फुले-शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेचे दर्शन घडते.

त्यांनी सामाजिक आशयावरील पुरस्कार प्राप्त चित्रपट लघुपटांसाठी संगीत दिग्दर्शन केले.तसेच अनेक मराठी चित्रपटासाठी गायनाचा साज देखील चढविला आहे. डॉ. जयभीम शिंदे हे  परंडा (Paranda) येथील सेवा निवृत शिक्षक एस. के. शिदे (S.K.Shinde) यांचे  सुपुत्र आहेत.