jeur News | जेऊरमध्ये धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त बलिदान मासाला सुरुवात…

जेऊर (jeur News) येथील मारुती मंदिर येथे छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त बलिदान मासाला प्रतिमेला पुष्प हार घालून व छत्रपती श्री संभाजी महाराज हिंदू हृदय सूर्य वंदना करून श्रीराम जन्मोत्सव सोहळा समिती जेऊर कडून सुरुवात करण्यात आली.

धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने जेऊर येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा समिती आयोजित अखंड ४० दिवस नित्य पूजन व स्मरण करण्यात येणार आहे. धर्मवीर बलिदान मास पाळला जाणार आहे. त्यांची शनिवार दिनांक ९ रोजी सुरुवात झाली‌. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचे बलिदान आणि त्या बद्दलची कृतज्ञता म्हणून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळला जातो. औरंग्याने छत्रपती शंभुराजांना ४० दिवस वेदना देऊन हत्या‌ केली. शंभुराजांना ४० दिवस वेदना दिल्या. याची या‌ महिन्यात जाणीव रहावी. म्हणून आवडीच्या वस्तू पदार्थांचा त्याग केला जातो.

माघ वद्य पंचमी, शनीवार दिनांक ९ मार्च २०२४ ते फाल्गुन अमावस्या ८ एप्रिल २०२४ पर्यंत हा मास पाळला जाणार आहे. जेऊर (jeur News) येथील मारुती मंदिर येथे रोज सायंकाळी सात वाजता छत्रपती श्रीसंभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि आणि हिंदू हृदय सूर्य वंदना केलीे जाणार आहे.

औरंग्याने छत्रपती शंभूराजांची ४० दिवस वेदनाकारक रित्या हत्या केली होती. म्हणून या कालावधीत संपूर्ण महिना सुखाचा त्याग करीत सूतकाचा महिना पाळतात. या दरम्यान, ४० दिवस गोड खायचे नाही. पायात चप्पल घालायचे नाही. गादी एवजी जमिनीवर झोपायचे. यापैकी कोणतीही एक गोष्ट पाळली तरी अशा कृतीतून श्रदांजली व बलिदान मास पाळला जातो. बलिदान मास ही समाजमन घडवणारी, प्रभावी अशी श्रद्धांजली वाहण्याची पद्धत आहे. शिवप्रेमींनी सर्व बांधवांना हे समजावून सांगावे. यामध्ये सहभागी व्हावे. असे आवाहन आयोजक श्रीराम जन्मोत्सव सोहळा समिती व सकल हिंदू समाज जेऊर च्या वतीने  केली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

धर्मवीर बलिदान मास उभ्या हिन्दु समाजाला अंतर्मुख करणारा, क्लेशकारक, दुःखदायक मास आहे. हा मास सर्वांनी सामाजिक पातळीवर, कुटुंब पातळीवर व व्यक्तिगत पातळीवर पाळला पाहिजे. हीच खरी श्रदांजली धर्मवीर संभाजी महाराजांना आहे.

महत्वाच्या बातम्या :

लोकसभेच्या निवडणुकीत माझी काळजी घ्या, पुढे मी तुमची काळजी घेईन – Pankaja Munde

तुम्ही ज्या जागा जिंकू शकणार नाहीत, त्याच मविआ तुम्हाला देत आहे- Nitesh Rane

खोट्या शपथा घेऊन आई तुळजाभवानीचा अपमान करू नका; Chandrashekhar Bawankule यांचा पलटवार