देशातील काँग्रेसचा जनाधार संपला असल्याने राहुल गांधी संघ आणि सावरकर यांच्यावर टीका करत आहेत ? 

पुणे  : काँग्रेसची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या सुरु आहे. यात बोलताना राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी विधान केलं. भारत जोडो यात्रेदरम्यान संबोधित करताना राहुल गांधी यांनी विनायक सावरकर यांच्यावर टीका केली.

सावरकर इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे. काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीच्या विरोधात जात ते इंग्रजांसोबत काम करायचे. सावरकर तुरुंगातून बाहेर आले तेव्हा खरे सावरकर सगळ्यांसमोर आले. सावरकरांनी इंग्रजांना पत्र लिहिली. त्यानंतर इंग्रजांनी त्यांना सोबत काम करण्याचं आमंत्रण दिलं. सावरकरांनी इंग्रजांसमोर हात जोडले आणि मी आपल्यासोबत काम करायला तयार आहे. सावरकर यांची विचारधारा देशाला तोडणारी आहे, तीच विचारधारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची आहे. तुमच्या अपेक्षेप्रमाणे मी काम करेन, असं म्हणत राहुल गांधी यांनी सावरकरांच्या स्वातंत्र्य लढ्यातील भूमिकेवर टीका केलीय.

दरम्यान,  भारतमातेच्या थोर सुपुत्राचा आणि एका मराठी महापुरुषाचा राहुल गांधींनी अपमान केल्याचे राजकीय पडसाद आता उमटू लागले आहेत.भाजप नेते गिरीश खत्री यांनी देखील या मुद्द्यावरून राहुल गांधी आणि ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान केले आहे. ते  आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करून राहुल गांधी यांना पप्पू ही जनतेने दिलेली उपाधी किती योग्य आहे ते पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. भारतमातेच्या थोर सुपुत्राचा आणि एका महापुरुषाचा राहुल गांधींनी अपमान पुन्हा एकदा केला आहे.  ज्यांच्या पूर्वजांनी देशाची फाळणी केली ते राहुल गांधी भारत जोडो यात्रा काढत आहेत. प्रत्यक्षात या यात्रेतून देश तोडण्याची भाषा केली जाते. अखंड हिंदुस्थानचे स्वप्न पाहणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधाने केली जातात.

सावरकर यांच्याबद्दल बोलण्यापूर्वी राहुल गांधींनी भारतीय स्वातंत्र्य इतिहासाचा अभ्यास करावा. देशातील काँग्रेसचा जनाधार संपला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि वीर सावरकर यांचा हिंदुत्वाच्या विचाराचा भारतीय जनतेने स्वीकार केला आहे. त्यामुळे नैराश्यातून राहुल गांधी बेताल वक्तव्य करीत आहेत. त्यांना देशात अराजकाची स्थिती निर्माण करायची आहे.आश्यर्य तर या गोष्टीचंही वाटतं कि सावरकरांचा सतत अपमान करणाऱ्या सोबत मा.बाळासाहेबांचे वारसदार फिरतात. उद्धव ठाकरेंचे मौन म्हणजे त्यांचीही या टीकेला मूकसंमती आहे असे समजावे का ? राहुल गांधींचा निषेध आणि त्यांच्या टीकेला मूकसंमती देणाऱ्या उद्धव ठाकरेंचाही निषेध. असं खत्री यांनी म्हटले आहे.