आदित्य ठाकरे असणार ठाकरे गटाकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार ? जाणून घ्या नेमकी का सुरु झाली आहे चर्चा

नागपूर – गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री कोण होणार यावरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बॅनर्स लावून आपले मत व्यक्त केले होते मात्र आता असंच काहीसे आता ठाकरे गटात देखील सुरु झाले आहे. शिवसेना (ठाकरे गट)चे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)  हे दि. २२ मे रोजी नागपूर दौऱ्यावर आहेत. औष्णिक वीज प्रकल्प आणि कोळसा उद्योगामुळे होणाऱ्या प्रदुषणाबाबात हा दौरा आहे. त्यावेळीच या दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर नागपूरात झळकलेल्या बॅनरची सध्या सगळीकडेच चर्चा आहे.

मुंबई तरुण भारतने दिलेल्या वृत्तानुसार, आदित्य ठाकरे यांचे नागपूरात भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असणारे बॅनर्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे या पोस्टर्सनी मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तसेच राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे.

नागपूरच्या रामटेक आणि कन्हान येथील रस्त्यांवर आणि बस स्टॉपवर हे पोस्टर्स लागले आहेत. त्यावर भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब, आपले रामटेक विधानसभा मतदारसंघात हार्दिक स्वागत, असा मजकूर दिला आहे. ठाकरे गटाचे युवा सेना जिल्हाप्रमुख लोकेश बावनकर आणि उपजिल्हाप्रमुख समीर मेश्राम यांनी हे पोस्टर्स लावले आहेत. आता आदित्य ठाकरे याबाबत काय भूमिका मांडणार हे लवकरच दिसून येईल.