Jyoti Waghmare | दाढी ही छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांना शोभते तुमच्या सारख्या कावळ्यांना नाही

Jyoti Waghmare : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर खूप बोचरी टीका केली. ‘दाढीने काडी केली, तर तुमची लंका जळून जाईल’ असं काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. त्यावर संजय राऊत यांनी पलटवार केला. “लंका त्यांचीच आहे, आम्ही हुनमान आहोत. लंका रावणाची जळते. दाढी रावणाला होती, रामाला नाही. हे समजून घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांना रामायण, महाभारात वाचाव लागेल” असं संजय राऊत म्हणाले.

“कोणाच काय जळतय हे लवकरच कळेल. मुळात दिल्लीची लंका जळतेय. तम्ही जिथे गेलाय, त्यांचीच लंका जळणार. “तुझी दाढी दिल्लीच्या हातात आहे. दिल्लीला वाटेल, तेव्हा दाढी खेचून तुला बोलवतात. रावणाची लंका होती. महाराष्ट्रात पंचवटीला रामाच वास्तव्य होतं. तुझ्या दाढीला आग लावणार” असं संजय राऊत म्हणाले.

त्यावर आता शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांची संजय राऊतांवर सडकून टीका केली आहे. दाढी ही छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांना शोभते तुमच्या सारख्या कावळ्यांना नाही. छत्रपती छत्रपती शिवराय,छत्रपती संभाजी महाराज, शहाजीराजे महात्मा फुले, गुरुगोविंद सिंग,गुरुनानक,नवनाथांनाही दाढी होती. असे त्या म्हणाल्या.

तुम्हाला काय कळणार दाढीवाल्यांचा Swag आणि एकनाथजी शिंदे आहेत महाराष्ट्राचा वाघ. तुम्ही काडी लावत जा आम्ही विकासाची हिरवीगार झाडी लावत जाऊ, तुम्ही जाळण्याची भाषा करा आणि महाराष्ट्राला सांभाळण्याची भाषा करू. इथून पुढे जर दाढीवर बोललात तर शिवसैनिक तुमच्या अहंकाराची माडी उध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात असू द्या..असा इशारा देखील त्यांनी दिलाय.

महत्वाच्या बातम्या : 

कॉंग्रेसचे नेते Baba Siddique यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश; उपमुख्यमंत्री पवार यांनी केले स्वागत

Nikhil Wagle व सहकाऱ्यांवर पुण्यात प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करा – पृथ्वीराज चव्हाण

Chhagan Bhujbal | तुमची 5 लोकांनी सुपारी घेतलीये, ५० लाखांची …; छगन भुजबळांना पुन्हा एकदा धमकी