Sangli Lok Sabha | सांगली लोकसभेच्या आखाड्यात महायुतीमधील पक्षाची ‘एन्ट्री’; भाजपची डोकेदुखी जानकारांनी वाढवली ?

Sangli Lok Sabha constituency : सांगली लोकसभा निवडणूकीच्या आखाड्यात राष्ट्रीय समाज पक्षाने (Rashtriya Samaj Paksha) घेतलेली भूमिका अनेकांची डोकेदुखी ठरणार असे दिसत आहे. या मतदारसंघात कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभेची (lok Sabha Election) निवडणूक लढवण्याचा निर्धार करत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने कालिदास गाढवे (Kalidas Gadve) यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे स्वबळावर निवडणूक लढवण्याची निर्धार करत प्रचाराला देखील सुरुवात करण्यात आली आहे. कालिदास गाढवे यांनी आता सांगली लोकसभा मतदारसंघातल्या (Sangli Lok Sabha constituency) तालुक्यांमध्ये घोंगडी बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने संपर्क अभियान देखील सुरू करण्यात आले आहे.

माजी मंत्री राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली ही लोकसभा निवडणूक लढवण्यात येत असून कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढवणार असा विश्वास यावेळी कालिदास गाढवे यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या : 

कॉंग्रेसचे नेते Baba Siddique यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश; उपमुख्यमंत्री पवार यांनी केले स्वागत

Nikhil Wagle व सहकाऱ्यांवर पुण्यात प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करा – पृथ्वीराज चव्हाण

Chhagan Bhujbal | तुमची 5 लोकांनी सुपारी घेतलीये, ५० लाखांची …; छगन भुजबळांना पुन्हा एकदा धमकी