आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कमलाभवानी मातेस महाआरती, गोशाळेत चारा वाटप

Karmala -युवसेना प्रमुख तथा माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त(Aditya Thackeray Birthday) व शिवसेना वर्धापनदिनानिमित्त युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांच्या संकल्पनेतून ‘भगवा सप्ताह’ कार्यक्रमातंर्गत सात दिवस विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत.यामध्ये शालेय साहित्य वाटप, मोफत आधार कार्ड शिबीर, जेष्ठ नागरिक यांचा सन्मान, रुग्णांना फळे वाटप,  वृक्षारोपण, निष्ठावंत शिवसैनिक यांना  निष्ठेचे शिलेदार  पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे हे दुसरे वर्ष असून आज करमाळ्याचे आराध्य दैवत आई कमलाभवनी मातेस महाआरती करुन या उपक्रमास सुरुवात झाली.करमाळा नगरी चे नगराध्यक्ष वैभवराजे जगताप शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे यांच्या शुभाहस्ते आई कमलाभावनी महाआरती करुन पुजा करण्यात आली .त्याचबरोबर नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांच्या वतीने गुरु गणेश गोशाळेत चारा वाटप करण्यात आला.

या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख सुधाकर लावंड, शहरप्रमुख प्रविण कटारिया, उपशहरप्रमुख संतोष गानबोटे,लालासाहेब कुरेशी उपजिल्हाप्रमुख मयुर यादव, तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे ,युवासेना जिल्हा सरचिटणीस सोहेल पठाण, वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष विशाल लोंढे,तालुका समन्वयक कुमार माने,तालुका सरचिटणीस पांडुरंग ढाणे,शहरप्रमुख समीर हलवाई,युवासेना शहर उपप्रमुख कल्पेश राक्षे,युवासेना उपप्रमुख प्रसाद निंबाळकर,पैलवान ग्रुप अध्यक्ष पै.पप्पू चोरमुले,पै.रोहन साळुंखे,गणेश कुकडे,तानाजी कुकडे,राहुल कुकडे,अतुल देवकर,रोहिदास आल्हाट,बाळासाहेब कांबळे संजय पडवळे, सर्जेराव मांगले यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि युवासैनिक उपस्थित होते.