‘विराट काका मी वामिकाला डेटवर नेऊ का?’ म्हणणाऱ्या चिमुकल्याच्या पालकांना कंगानाने झापलं

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. चित्रपटांव्यतिरिक्त ती सोशल मीडियावर व्हायरल होणार्‍या फोटो आणि व्हिडिओंवरही प्रतिक्रिया देताना दिसत आहे. यादरम्यान, पंगा क्वीनने काही दिवसांपूर्वी आयपीएल सामन्यादरम्यान एका मुलाने पकडलेल्या प्लेकार्डवर तिची प्रतिक्रिया दिली आहे. मुलाच्या व्हायरल झालेल्या फोटोवर प्रतिक्रिया देताना कंगनाने त्याच्या आई-वडिलांना चांगलेच झापले आहे.

आयपीएल 2023 चे व्हायरल मुलाचे प्लेकार्ड
काही दिवसांपूर्वीच एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (CSK vs RCB) संघात सामना झाला होता. याच सामन्यादरम्यान एका मुलाने विराट कोहलीचे फलक हातात घेतलेल्या छायाचित्राने सोशल मीडियावर नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले. प्लेकार्ड धरलेल्या मुलाने विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांना खास विनंती केली होती. फलकावर लिहिले होते, ‘हाय विराट काका. मी वामिकाला (Vamika Kohli) डेटवर घेऊन जाऊ का?’

चिडलेल्या कंगनाने पालकांना झापले
मुलाच्या हातातील हे फलक पाहून ‘क्वीन’ कंगना राणौतला राग आला. मुलाच्या पालकांवर ताशेरे ओढत अभिनेत्रीने लिहिले आहे की, ‘हा मूर्खपणा निरागस मुलांना शिकवू नका, यामुळे तुम्ही मॉडर्न किंवा कूल नाही अश्लील आणि मुर्खासारखे दिसता.’