तू असं करायल नको होतंस…; तृप्तीच्या रणबीरसोबतच्या तसल्या सीनवर पालकांनी व्यक्त केली नाराजी!

Tripti Dimri Parents Reaction: सध्या सर्वत्र संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘अ‍ॅनिमल’ (Animal) या चित्रपटाची चर्चा आहे. ज्याप्रमाणे चित्रपटात बॉबी देओल रणबीर कपूर पेक्षा जास्त भाव खाऊन गेल्याचे बोलले जात आहे, तसेच तृप्ती डिमरीबाबतही बोलले जात आहे. या चित्रपटात तृप्ती डिमरीने मुख्य अभिनेत्री रश्मिका मंदान्नापेक्षा जास्त मार्केट खाल्ले आहे. तिच्या इंटिमेट सीन्सने (intimate Scene) अनेक बातम्या मिळवल्या आहेत. अनेकांनी अभिनेत्रीला फटकारले आणि टीका केली. काही वेळापूर्वी तृप्ती डिमरीने या टीकेवर प्रतिक्रिया दिली होती. आता तिने ‘अ‍ॅनिमल’मधील तिच्या इंटिमेट सीनवर तिच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया शेअर केली आहे.

तृप्ती डिमरीने ‘अ‍ॅनिमल’मध्‍ये 12 वर्षांनी मोठा रणबीर कपूरसोबतचे इंटीमेट सीन केल्‍यानंतर तिच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया काय होती हे सांगितले आहे. तृप्ती डिमरीने ‘बॉलीवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, अॅनिमल’मधील तिचे इंटिमेट सीन्स पाहून तिचे आई-वडील हैराण झाले होते. तृप्ती डिमरी म्हणाली, माझ्या पालकांना थोडे आश्चर्य वाटले. ते म्हणाले की आम्ही चित्रपटांमध्ये असे काही कधीच पाहिले नाही आणि तू ते केले आहे. त्यांना त्या दृश्यातून सावरायला वेळ लागला. परंतु याविषयी बोलताना माझे पालक माझ्यासाठी खूप गोड बोलत होते. ते म्हणाले की तू असे करायला नको होते, पण ठीक आहे, हरकत नाही. पालक या नात्याने आपल्याला हे नक्कीच वाटेल.

तृप्ती पुढे म्हणाली, मी त्यांना सांगितले की मी काहीही चुकीचे करत नाही. हे माझे काम आहे आणि जोपर्यंत मी आरामदायी आणि सुरक्षित आहे तोपर्यंत मला त्यात कोणतीही अडचण दिसत नाही. मी एक अभिनेत्री आहे आणि मी साकारलेल्या पात्राप्रती मी 100 टक्के प्रामाणिक असले पाहिजे आणि मी तेच केले.

5 लोकांच्या उपस्थितीत इंटीमेट सीन शूट करण्यात आले
याआधी तृप्ती डिमरीने सांगितले होते की, इंटिमेट सीनच्या शूटिंगदरम्यान सेटवर फक्त पाच लोकांनाच बसण्याची परवानगी होती. शूटिंगदरम्यान रणबीर तृप्तीला अस्वस्थ आहे की नाही हे वारंवार तपासत होता.

महत्वाच्या बातम्या-

NIA ची मोठी कारवाई; 44 ठिकाणी छापेमारी, भिवंडी-ठाण्यात इसिस कनेक्शन

जालना लोकसभा मतदारसंघातून दानवे विरूद्ध जरांगे सामना होण्याची शक्यता?

हिवाळ्यात शेंगदाण्याची चिक्की शरीराला देते ऊब, 10 मिनिटात बनवा Peanut Chikki