‘तो व्हिडीओ आला की मी भांडाफोड करणार आहे’, करुणा मुंडेंचे लक्षवेधी वक्तव्य; जाणून घ्या प्रकरण

छत्रपती संभाजीनगर- महाराष्ट्रात सध्या सगळीकडे बाजार समितीच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकीत खूप घाणेरडापणा सुरू आहे. खालच्या पातळीवर जाऊन काम करत आहेत. त्याचा मी लवकरच भांडाफोड करणार आहे, असे खळबळजनक वक्तव्य  शिवशक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्ष करुणा शर्मा-मुंडे (Karuna Munde) यांनी केले आहे. त्या संभाजीनगरमधील पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

मी संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद घेत आहे. कारण महाराष्ट्रात सध्या सगळीकडे बाजार समितीच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकीत खूप घाणेरडापणा सुरू आहे. खालच्या पातळीवर जाऊन काम करत आहेत. त्याचा मी लवकरच भांडाफोड करणार आहे, मी जो गौप्यस्फोट करणार आहे तो राजकारणाशी संबंधित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं (NCP) राजकारण सगळे लोक बघू शकतात. दोन दिवसांनी माझ्याकडे एक व्हिडीओ येणार आहे. तो व्हिडीओ आला की मी भांडाफोड करणार आहे. सध्या माझ्याकडे काही रेकॉर्डिंग आणि कागदपत्रे आहेत. व्हिडीओ आला की मी हा भांडाफोड करणार आहे, असे करुणा मुंडे म्हणाल्या आहेत. लोकसत्ताने याबाबत वृत्त दिले आहे.

त्यामुळे आता करुणा मुंडे नेमका काय भांडाफोड करतील? आणि याचा राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होईल?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.