Maharashtra Politics | ओबीसींचा कळवळा दाखविणारे पटोले-वडेट्टीवार आता राजीनामा द्या!

Maharashtra Politics : राहुल गांधी (Rahul Gandhi) संपूर्ण देशातील ओबीसी समाजाचा वारंवार अपमान करीत आहेत. आणि, त्यांच्या पक्षातील ओबीसी नेते म्हणविणारे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) व विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) गप्पगार आहेत. त्यांनी राहुल गांधींच्या विधानाचा निषेध करावा व पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा असा हल्लाबोल भारतीय जनता पार्टीचे (Maharashtra Politics) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी केला.

नागपूर येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्त्वात जोरदार आंदोलन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी दोन्ही विरोधीपक्षातील नेत्यांवर टीका केली. ते म्हणाले, राहुल गांधी पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल ज्या आकसाने बोलतात त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीवरून आणि आवेशातून त्यांच्या मनातील ओबीसी समाजाबद्दलची चिड दिसून येते. ओबीसी समाजाचा वारंवार होणार अपमान कधीही विसरता येणार नाही. संपूर्ण ओबीसी समाज कॉंग्रेसला करंट लावल्याशिवाय राहणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध केलेल्या बेताल वक्तव्याविरोधात भाजपाने राज्यभर तीव्र आंदोलन पुकारले आहे. राज्यभर सर्वत्र सर्व जिल्हा मुख्यालयी व महत्वाच्या शहरात भाजपा तसेच ओबीसी मोर्चाच्या वतीने आंदोलन सुरू आहे. उद्या शनिवारी दि. १० रोजी राज्यभरातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी भाजपाने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

नागपूर येथील आंदोलनात आ. कृष्णा खोपडे, आ. समीर मेघे, आ. टेकचंद सावरकर, आ. प्रवीण दटके, ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी डॉ. आशिष देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम, नागपूर शहराध्यक्ष बंटी कुकडे, नागपूर जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, अनुराधा अमीन, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. राजीव पोतदार, माजी आमदार सुधीर पारवे, गिरीश व्यास, मल्लिकार्जून रेड्डी, बुटीबोरीचे नगराध्यक्ष बबलू गौतम, अशोक धोटे, अर्चना डेहनकर, बाल्या बोरकर, प्रगती पाटील, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष फुटाने, कार्याध्यक्ष रोहीत पारवे, किशोर रेवतकर, दिनेश ठाकरे, रोहित मुसळे, महेश दिवसे, दिलेश ठाकरे, डॉ. प्रिति मानमोडे, नरेश मोटघरे, जयप्रकाश गुप्ता, श्रद्धा पाठक, नरेंद्र धनोले यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा व भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या : 

Vijay Vadettiwar | सरकारी तिजोरी स्वच्छ करण्याच्या मंत्र्यांमधील स्पर्धेला आता ऊत आलाय

Maharashtra Politics | पक्ष चोराचोरीत दंग असलेल्या महायुती सरकारला शेतकऱ्यांचा विसर

Maharashtra Kranti Sena | महायुतीची ताकत वाढली; आणखी एका पक्षाची मिळणार साथ