लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा बिघडली, राज ठाकरे ब्रीच कँडीत दाखल

मुंबई : गानसम्राज्ञी आणि भारतरत्न लता मंगेशकर यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. लतादीदींची प्रकृती चिंताजनक असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही तातडीने ब्रीच कँडीत धाव घेतली असून डॉक्टरांकडून लतादीदींच्या प्रकृतीची विचारपूस करत आहेत. Tv9 ने याबाबत वृत्त दिले आहे.

काही दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांना करोनाची लागण झाली होती. त्यासोबतच त्यांना न्यूमोनियाही झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. आता पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे.दरम्यान, डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती ब्रीच कँडी रुग्णालयाचे डॉक्टर प्रतीत समदानी यांनी सांगितलं.

दरम्यान, लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर प्रतीत समदानी आणि त्यांची टीम त्यांच्या प्रकृतीची सतत काळजी घेत आहे. पुन्हा एकदा लतादीदींची तब्येत बिघडल्यानं डॉक्टरांनी त्यांना तातडीनं व्हेंटिलेटरवर ठेवलं. त्यांच्या उपचारासाठी डॉक्टरांचे पथक 24 तास रुग्णालयात हजर असतं.