लाल महालात लावणी,आव्हाडांनी ट्विट करून केला निषेध व्यक्त

Pune – पुण्यातल्या लाल महाल (Lal Mahal) ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. सध्या पुणे महापालिकेने उन्हाळ्याच्या सुट्टीत हा लाल महाल पर्यटकांसाठी बंद ठेवला आहे. अशातच लाल महालात रिल्स काढण्याच्या निमित्ताने सिनेमातील गाण्यांवर आधारित रिल्सचं शुटिंग करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

मानसी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे (Mansi Patil, Kuldeep Bapat and Kedar Avsare) यांनी हे गाणं त्या ठिकाणी लाल महालात शूट केला आहे. त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी केली जात आहे. या प्रकरणावर अनेक राजकीय, सामाजिक आणि कलाविश्वातील लोकांकडून उलट-सुलट प्रतिक्रिया येत आहेत.

लाल महालातील लावणीच्या या व्हिडीओ राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी आक्षेप नोंदवला आहे. तसेच नागरिकांना असे प्रकार पुन्हा करू नये असा आवाहन केलेय, यावर मंत्री जितेंद्र आव्हाड ट्विट करत म्हणाले की, पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा लाल महाल ही वास्तू नाच गाण्यांचे चित्रीकरण करण्याची जागा नव्हे, यापुढे असे होता कामा नये, कोणी केले असेल तर चित्रीकरण वापरू नका. असं त्यांनी म्हटलं आहे.