Rohit Pawar | ‘अजित पवारांसोबत गेलेल्या नेत्यांना सरकारकडून लाभ मिळतायत, तरीही…’, रोहित पवारांचे सुनेत्रा पवार यांना उत्तर

Rohit Pawar On Sunetra Pawar | बारामती लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. येथे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत पाहायला मिळू शकते. या निवडणुकीवरुन अजित पवार कुटुंब एकटं पाडलं जात असून यावरुन सुनेत्रा पवार यांनी श्रीकृष्णाला कुटुंबातील लोकांनी घेरल्याचं म्हणत विरोधककांवर टीका केली होती. यावर आता रोहित पवारांनी सुनेत्रा पवारांना प्रत्युत्तर दिले आहे. भोर येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, “अजित पवार यांच्या सोबत गेलेल्या नेत्यांना अनेक प्रकारचे लाभ सरकारकडून देण्यात आलेत, त्यामुळं 80% लाभार्थी दादांसोबत असतील पण 100% पुरोगामी विचाराचे कार्यकर्ते, नागरिक ते सर्व पवार साहेबांसोबत आहेत. लोकशाहीमध्ये लढणं, भूमिका घेणं महत्वाच असतं, विचार बदलणं हे लोकशाहीमध्ये नसतं; तुम्ही पुरोगामी विचार सोडून प्रतिगामी विचाराकडे गेला, हे कितपत योग्य आहे?”, असे उत्तर रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या विधानाला दिले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शिवसेना शिंदे गटाने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी, पाहा कोणाला मिळालं तिकीट?

Nana Patole | लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढण्याची गरज

Prakash Ambedkar | ‘वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला’! आंबडेकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल