Rohit Pawar | राज ठाकरेंकडे फक्त एकच आमदार, तरीही महायुतीत बोलावलं, विचार करा; रोहित पवारांचा मनसेला सल्ला

Rohit Pawar On Raj Thackeray | लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) महायुतीत सहभागी होमार असल्याच्या चर्चा आहेत. राज ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेटदेखील घेतली आहे. मात्र अद्याप मनसे अधिकृतपणे महायुतीत सामील झाल्याची घोषणा झालेली नाही. राज ठाकरेंच्या या भूमिकेवरुन विरोधकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही भोर येथील पत्रकार परिषदेत राज ठाकरेंना सल्ला दिला आहे.

रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, राज ठाकरे यांच्याकडे एक आमदार, राज ठाकरे मोठे नेते आहेत, त्यांच भाषण मला आवडत होत, ते बेरोजगारी, महागाईचे विषय मांडायचे.. आज ते भाजप बरोबर जात असतील तर बेरोजगारी होती त्यापेक्षा अजून वाढली आहे, मराठी अस्मितेला अडचणीत आणण्याचं कामं सुरू आहे, सगळे प्रोजेक्ट गुजरातला चालले आहेत एवढं सगळं असताना ते जर भाजप सोबत जात असतील तर त्यांनी 2019 ला मांडलेली भूमिका चुकीची होती किंवा आत्ता मांडत असलेली भूमीका चुकीची किंवा सोयीची आहे, असे त्यांनी म्हटले.

मी आता इथे फक्त एक विनंती करू इच्छितो की राज साहेबांनी अजून सुद्धा विचार करावा, ही भूमिका त्यांच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आवडणार नाही, असा सल्लाही यावेळी रोहित पवारांनी दिला.

उदयनराजे भोसलेंचे उदाहरण देताना रोहित पवार म्हणाले, उदयनराजे जेव्हा अमित शहा यांची भेट घ्यायला दिल्लीमध्ये गेले होते, तेव्हा भेट घेण्यासाठी त्यांना तीन दिवस लागले, त्यानंतर आम्ही हा मुद्दा मांडल्यानंतर, सोशल मीडियावर चर्चा झाल्यानंतर त्यांना ती भेट मिळाली. पण राज ठाकरेंकडे फक्त एक आमदार असताना त्यांना त्या ठिकाणी लाल कार्पेट टाकून बोलावलं गेलं, हाच फरक आहे, भाजपाला फक्त राजकारण पडलेल आहे.

उदयनराजेंना पक्षात घेताना मोठा कार्यक्रम केला गेला, पार्टीत घेताना मोठा कार्यक्रम केला जातो आणि कालांतराने भाजप त्याचा कार्यक्रम करत.. हेच आता अजित दादा, एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत सुद्धा होताना दिसेल.. आणि तसच राज ठाकरेंचा सुद्धा होऊ शकतं, असा इशाराही रोहित पवार यांनी यावेळी दिला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शिवसेना शिंदे गटाने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी, पाहा कोणाला मिळालं तिकीट?

Nana Patole | लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढण्याची गरज

Prakash Ambedkar | ‘वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला’! आंबडेकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल