कोल्हापूरच्या मुलीचा नाद खुळा, बनली फ्रेंच कंपनीची सीईओ

2021 हे वर्ष भारतीयांनी गाजवलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण जगातील मोठ्या समजल्या जाणाऱ्या अनेक कंपन्याच्या सीईओपदी भारतीय विराजमान झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा जगाला भारतीय बुद्धिमतेची दखल घ्यावी लागली आहे. फ्रेंचमधील शनैल या प्रसिद्ध फॅशन कंपनीच्या सीईओपदी भारतीय वंशाच्या लिना नायर यांची निवड झाली आहे. नीला आणि कोल्हापूर याचं एक खास नातं आहे. कारण लिना यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापुरात झाले आहे. लिना यांचा जन्म 11 जून 1969 रोजी कोल्हापुरात झाला.

त्यांनी शालेय शिक्षण कोल्हापुरात पूर्ण केल्यानंतर सांगलीतील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग पूर्ण केले. त्या नंतर त्यांनी जमशेदपुर येथून एमबीए केले. त्या तेथे देखील गोल्ड मेडलिस्ट आहेत. त्यांनी 1992 मध्ये हिंदुस्थान युनिलीव्हरमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून त्या रुजू झाल्या. 2016 मध्ये मुख्य मानव संसाधन अधिकारी बनल्या. आता हिंदुस्थान युनिलीव्हरचे नाव युनिलीव्हर आहे. शनैल ही कंपनी जगातील महागडे हँड बॅग आणि परफुम्स बनविणारी कंपनी आहे. एक कोल्हापूरकर मुलगी जगातील नामवंत कंपनीची सीईओ बनविते ही अभिमानाची गोष्ट आहे.लिना मागील तीस वर्षांपासून युनिलीव्हरमध्ये काम करत होत्या. आता त्या एक जानेवारी रोजी शनैल  कंपनीत  रुजू होणार आहेत.