लेफ्टनंट जनरल मनोज पांडे होणार भारताचे नवे लष्करप्रमुख

नवी दिल्ली- लेफ्टनंट जनरल मनोज पांडे (Lieutenant General Manoj Pandey) हे भारताचे पुढील लष्करप्रमुख (Army chief) असतील. जनरल मनोज पांडे हे सध्या लष्कराचे उपप्रमुख (Deputy Chief of Army Staff) आहेत. जनरल एमएम नरवणे (General MM Narwane) या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होत आहेत. विशेष म्हणजे जनरल मनोज पांडे हे पहिले अभियंता असतील जे भारतीय लष्कराची कमान सांभाळतील.

मनोज पांडे यांना डिसेंबर 1982 मध्ये कॉर्प्स ऑफ इंजिनीअर्समध्ये (Corps of Engineers) नियुक्त करण्यात आले होते. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ पल्लनवाला सेक्टरमध्ये ऑपरेशन पराक्रम दरम्यान इंजिनियर रेजिमेंटचे नेतृत्व केले आहे. आपल्या 39 वर्षांच्या लष्करी कारकिर्दीत, लेफ्टनंट जनरल पांडे यांनी वेस्टर्न थिएटरमध्ये इंजिनियर ब्रिगेड, एलओसीवर पायदळ ब्रिगेड, लडाख सेक्टरमधील माउंटन डिव्हिजन आणि ईशान्येकडील कॉर्प्सचे नेतृत्व केले आहे. ईस्टर्न कमांडचा पदभार स्वीकारण्यापूर्वी ते अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर-इन-चीफ होते.आता पांडे हे लष्कराचे २९ वे प्रमुख म्हणून पदभार घेतील.

संरक्षण मंत्रालयाने (Ministry of Defense) सोमवारी याबाबत घोषणा केली. सरकारने लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची पुढील लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे, असं संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले. पांडे हे नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांना डिसेंबर १९८२ मध्ये कोर ऑफ इंजिनीअर्समध्ये सहभागी करून घेतले होते. मनोज पांडे यांनी जम्मू -काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर आणि पल्लनवाला सेक्टरमध्ये ऑपरेशन पराक्रम दरम्यान इंजिनीअर रेजिमेंट म्हणून नेतृत्व केले होते.

जनरल मनोज पांडे यांचा जन्म डॉ. सीजी पांडे आणि प्रेमा यांच्या पोटी झाला, जे ऑल इंडिया रेडिओचे उद्घोषक आणि होस्ट होते. त्यांचे कुटुंब नागपूरचे आहे. शालेय शिक्षण झाल्यावर जनरल मनोज पांडे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत रुजू झाले. एनडीएनंतर, त्यांनी इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये प्रवेश घेतला आणि अधिकारी 3 मे 1987 रोजी शासकीय दंत महाविद्यालयाच्या सुवर्णपदक विजेत्या अर्चना सालपेकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला.